Home | International | Other Country | osama bin laden wife inform america

लादेनच्या बायकोनेच केला विश्वासघात, अमेरिकेला दिली माहिती

Agency | Update - May 23, 2011, 11:19 AM IST

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये लपला असल्याची माहिती अमेरिकेला त्याची सर्वात कमी वयाच्या बायकोनेच दिली असल्याचे समोर येत आहे.

  • osama bin laden wife inform america

    लंडन - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये लपला असल्याची माहिती अमेरिकेला त्याची सर्वात कमी वयाच्या बायकोनेच दिली असल्याचे समोर येत आहे.

    लादेनच्या तिन्ही बायका अमेरिकेच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या तिन्ही बायकांमध्ये वाद सुरु आहे. पहिल्या दोन्ही बायकांचा आरोप आहे की सर्वात कमी वयाच्या बायकोनेच लादेनबद्दल माहिती दिली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री रहमान मलिक यांनीही अमेरिकेला लादेनबद्दल माहिती पुरविणारा त्याच्या घरातच असल्याचे म्हटले होते. लादेनची सर्वात छोटी बायको येमेनमधील रहिवासी असून, तिचे नाव अमल अहमद अल सदह असे आहे. लादेनला ठार मारले होते तेव्हा तिच्या पायाला गोळी लागली होती. यावर अमेरिकेने स्पष्टीकरण देताना तिने अमेरिकन सैनिकावर गोळीबार केल्याने तिला गोळी मारण्यात आली होती. अबोटाबाद येथील घरात लादेनच्या पहिल्या दोन्ही बायका दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या आणि लादेन तिसऱ्या मजल्यावर सर्वात छोट्या बायकोबरोबर राहत असे. या तिघींमध्ये कायम वाद होत असल्याचेही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Trending