एका रोलसाठी जीव / एका रोलसाठी जीव टाकला धोक्यात, दीड महिना एका खोलीत होता बंद; भूमिका साकारल्यानंतर घ्याव्या लागल्या झोपेच्या गोळ्या, वयाच्या 28 व्या वर्षी झाले निधन

Feb 25,2019 05:36:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - 91 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा रविवारी लॉस एंजेलिस येथे घोषणा करण्यात आली. दरवर्षी विविध कॅटेगरींमध्ये हे पुरस्कार वितरित केले जातात. असाच एक पुरस्कार 2008 मध्ये आलेल्या 'द डार्क नाइट' चित्रपटात जोकरची भूमिका साकारणाऱ्या हीथ लेजरला मिळाला होता. जोकरची भूमिका साकारल्यानंतर हीथ लेजरला बेस्ट बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा ऑस्कर मिळाला होता. परंतु, दुर्दैवाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो या जगात नव्हता.


एका भूमिकेसाठी जीव धोक्यात...
हीथ लेजरने 11 वर्षांच्या आपल्या अॅक्टिंग करिअरमध्ये 17 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याने 'द डार्क नाइट' मध्ये मुख्य व्हिलेन जोकरची भूमिका साकारली होती. याच रोलसाठी त्याने आपला जीव धोक्यात टाकला होता. जोकरची भूमिका साकारणे काही सोपे काम नव्हते. त्याचे मेक-अप सुद्धा हीथ लेजर स्वतः करायचा. एवढेच नव्हे, तर कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी आणि त्याच्यासारखाच विचार करण्यासाठी त्याने स्वतःला 43 दिवस एका खोलीत बंद करून घेतले होते. बॅटमन सुपरहिरोवर अनेक चित्रपट बनवण्यात आले. त्यातही अनेकांनी जोकरची भूमिका साकारली. परंतु, हीथ लेजरने जसा आपल्या भूमिकेला न्याय दिला तसे कुणीच करू शकलेले नाही. आजही तो बॅटमनच्या जगतातील सर्वात उत्कृष्ठ 'जोकर' म्हणून ओळखला जातो.

शिक्षणही सोडले...
हीथ लेजर एक उत्कृष्ठ चेस प्लेअर होता. त्याने ऑस्ट्रेलियन जुनिअर चेस चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली होती. तो केवळ 11 वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांनी फारकत घेतली. 1992 मध्ये क्लोनिंग अराउंड आणि 1993 मध्ये शिप टू शोर अशा टीव्ही सीरिअलमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या 17 व्या वर्षी अॅक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. यानंतर वेळीच 1996 मध्ये टीव्ही सिरीझ स्वीटमध्ये काम मिळाले. लेजरच्या अॅक्टिंग करिअरला खरी कलाटणी 1997 मध्ये 'होम अॅन्ड अवे' या टीव्ही मालिकेतून मिळाली.

निधनाच्या 6 महिन्यांनंतर झळकला चित्रपट
त्याने जोकरची भूमिका अशा पद्धतीने अंगीकारली होती की त्याच्या डोक्यावर परिणाम दिसत होता. कित्येकवेळा झोप न लागल्याने त्याला झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या. 22 जानेवारी 2008 रोजी लेजरचे कार्डिएक अरेस्टने निधन झाले. त्याच्या निधनाच्या 6 महिन्यांनंतर चित्रपट रिलीझ झाला होता.

X