92 वा ऑस्कर / सलग दुसऱ्यांदा सूत्रसंचालकशिवाय पार पडेल ऑस्कर सोहळा, 9 वेळा कार्यक्रम होस्ट करणाऱ्या बिली क्रिस्टलने दर्शवली असहमती

  • ऑस्कर सोहळा 9 फेब्रुवारीला(भारतीय वेळेनुसार 10 फेब्रुवारीला पहाटे) होत आहे

दिव्य मराठी वेब टीम

Feb 09,2020 05:20:03 PM IST

हॉलिवूड डेस्क -92 वे अकॅडमी अवॉर्ड्स सलग दुसऱ्यावर्षी विना होस्ट पार पडणार आहे. सिनेमा जगतातील या अवॉर्डला 9 वेळा होस्ट केलेले बिली क्रिस्टल या गोष्टीशी सहमत नाहीये. एका कार्यक्रमादरम्यान बिली म्हणाला की, विना होस्ट कार्यक्रम लवकर होऊ शकतो. पण तसे परिणाम दिसणार नाहीत जे अपेक्षित असतात. 71 क्रिस्टल अमेरिकन अभिनेता, व्हीओ आर्टिस्ट, कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट आहे.


गुरुवारी जिमी किमेल लाइव्हमध्ये पोचलेला बिली म्हणाला होता की, विना होस्ट कार्यक्रम होणे अगदी तसेच आहे जशी विना साक्षीदारांची सुनावणी होणे. तसेच त्याने सांगितले की, त्याच्यासाठी होस्ट बनणे ट्रेडिशन आहे. जेव्हा आम्ही हे करतो, तेव्हा मला नेहमी वाटते की, मी जॉनी, बॉब होप आणि त्या लोकांसोबत उभा आहे, ज्यांच्यासोबत मी वाढलो.


9 वेळा अवॉर्ड्स सेरेमनी होस्ट केलेल्या बिलीने अकॅडमीला धन्यवाद म्हणाले. ते म्हणाले की, मी या विश्वासाचा सन्मान करतो, जो अकॅडमीने माझ्यावर दाखवला. मला तिथे असणे आवडते, ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. बिलीनुसार, होस्ट नसल्याचे नुकसान हे आहे की, तो समारंभ खुलवण्यासाठी कुणी नसते.

X