Hollywood / टीव्ही सीरीज 'फर्स्ट लेडीज' मध्ये मिशेल ओबामा यांचा रोल प्ले करणार आहे ऑस्कर विनर व्हिओला डेव्हिस 

'फर्स्ट लेडीज' या शोची प्रोड्यूसरदेखील आहे डेव्हिस

Aug 28,2019 10:13:00 AM IST

हॉलिवूड डेस्क : टीव्ही सीरीज 'फर्स्ट लेडीज' मध्ये मिशेल ओबामा यांचा रोल व्हिओला डेव्हिस साकारणार आहे. व्हिओलाने याचा खुलासा आपल्या ट्विटर अकाउंटवर केला. ही टीव्ही सीरीज अमेरिकेच्या फर्स्ट लेडीजच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यावर आधारित असेल. हे सीजन एलेनर रूसवेल्ट, बॅटी फोर्ड आणि मिशेल ओबामा यांच्यावर आधारित असेल.

शोची प्रोड्यूसरदेखील आहे डेव्हिस...
ऑस्कर अवॉर्ड विजेती असलेली व्हिओला या शोची प्रोड्यूसरदेखील आहे. या शोमध्ये एक-एक तासाच्या तीन कथा दाखवल्या जाणार आहेत. तसेच कादंबरीकार एरॉन कूले याने या शोसाठी स्क्रिप्ट तयार केली आहे. व्हिओला यापूर्वी थ्रिलर मुव्ही 'व्हिडोज' मध्ये दिसली होती.

यापूर्वीही बनला आहे चित्रपट...
यापूर्वीही मिशेल ओबामा यांच्या आयुष्यावरवर आधारित एक चित्रपट बनला होता. पण टीव्ही शो पहिल्यांदा बनत आहे. मिशेल यांच्यावर 2016 मध्ये 'साउथसाइड विथ यू' चित्रपट बनवला गेला होता. ज्यामध्ये टिका सम्पटरने मिशेल यांचा रोल केला होता. अमेरिकेच्या इतिहासातील फर्स्ट लेडीजवर बनत असलेली ही सीरीज शोटाइम आणि लॉयन्सगेटवर दाखवली जाणार आहे.

X