नियम / फिल्म इंडस्ट्रीतील आठ हजाराहून अधिक तज्ञांच्या वोटिंगनंतर निवडले जातात ऑस्कर विजेते , 6 वेळा झाले टाय

  • अकादमीचा वोटर होण्यासाठी अर्ज करावा लागतो.  फिचर फिल्मचा भाग असलेले लोक ब्रँचच्या कार्यकारी समितीच्या संमतीनंतर अकादमीचे मतदार बनतात.
  • प्राइसवाटरहाऊस कूपर्स नावाची अकाउंटिंग फर्म ऑस्कर बॅलेटची गणना करते. स्टेजवर विजेता घोषित होण्यापूर्वी कंपनीच्या दोन भागीदारांना निकाल माहित असतो.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 08,2020 02:23:06 PM ISTहॉलिवूड डेस्कः
येत्या 9 फेब्रुवारी रोजी अकादमी अवॉर्ड्स अर्थातच ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे. सिनेजगातील सर्वात मोठ्या या अवॉर्ड शोमध्ये 24 कॅटेगरीत पुरस्कार दिले जातात. अकादमीचे आठ हजाराहून अधिक मतदार विजेत्यांची निवड करतील. तथापि, ऑस्कर-विजेत्या चित्रपटांची निवड कशी केली जाते हे अद्याप ब-याच प्रेक्षकांना ठाऊक नाही. खरं तर विजेता निवडीची प्रक्रिया देखील अनेक कारणांमुळे वादात सापडली आहे. काही काळापूर्वी, ब्रिटीश अभिनेत्री कॅरी मुलिगन म्हणाली होती की, मतदारांनी हे सिद्ध केले पाहिजे की त्यांनी मतदान केलेले चित्रपट पाहिले आहेत.

कशी होते निवडणूक


अकादमी अवॉर्ड्स ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे 8,000 हून अधिक मतदार आहेत. प्रत्येक मतदार 17 वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी नामांकन करतो. विशेष गोष्ट अशी की, नॉमिनेशनच्या वेळी प्रत्येक मतदार आपल्या शाखेतच मतदान करू शकतो. उदाहरणार्थ, संपादक केवळ संपादकीय, अभिनेता केवळ अभिनय कॅटेगरीत मतदान करू शकतात. तथापि, सर्वांनाच सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मत देण्याचा अधिकार आहे.

नॉमिनेशन वोटिंग पेपर आणि ऑनलाइन बॅलेटद्वारे डिसेंबरच्या उत्तरार्धात नामांकन सुरू होते. त्यानंतर जानेवारीत लाइव्ह इव्हेंटद्वारे नामांकने जाहीर केली जातात. या नॉमिनेशन प्रक्रियेनंतर अंतिम मतदान केले जाते, ज्यामध्ये मतदार प्रत्येक शाखेत मतदान करू शकतात.

ऑस्करमध्ये 6 वेळा झाले होते टाय

  • 1931/32 मध्ये झालेल्या अकादमी अवॉर्ड्सच्या पाचव्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत 'डॉक्टर जॅकॉल और मिस्टर हायड'साठी फ्रेड्रिक मार्च आणि 'द चॅम्प'साठी वॉलेस बॅरी यांच्यात टाय झाला होता. बॅरीपेक्षा मार्चला एक मत अधिक मिळाले असले तरी अकादमीच्या नियमांनुसार ही स्पर्धा टाय मानली गेली होती.
  • 1949 मध्ये आयोजित 22 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये डॉक्यूमेंटरी (लघु विषय) कॅटेगरीत 'अ चान्स टू लिव्ह' आणि 'सो मच फॉर सो लिटल' यांच्यात टाय होता.
  • 41 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये 'द लायन इन विंटर'साठी कॅथरीन हपबर्न आणि 'फनी गर्ल 'साठी बार्बरा स्ट्रीसँड यांच्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत टाय झाला होता.
  • 1986 मधील डॉक्युमेंटरी (फिचर) कॅटेगरीत 'आर्टी शॉः टाइम इज ऑल यू हॅव गॉट' आणि 'डाउन अँड आउट इन अमेरिका' यांच्यात टाय होता.
  • 67 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये शॉर्ट फिल्म (लाइव्ह अ‍ॅक्शन) कॅटेगरीत 'फ्रांझ काफ्का' आणि 'ट्रेवर' यांच्यात टाय होता.
  • 2012 मध्ये 'स्कायफॉल' आणि 'झिरो डार्क थर्टी' यांच्यात साउंड एडिटिंग कॅटेगरीत टाय होता.
X