आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हॉलिवूड डेस्कः येत्या 9 फेब्रुवारी रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणा-या 2020 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील नॉमिनीजची गुडी बॅग अतिशय खास असणार आहे. नेहमी प्रमाणे ही गुडी बॅग अवॉर्ड नाईटच्या आधी ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या कलाकारांना दिली जाणार आहे. या बॅगमध्ये देण्यात येणाऱ्या गिफ्ट्सची एकूण किंमत 2.15 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 1.2 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. एका पत्रकार परिषदेत गुडी बॅगमध्ये देण्यात येणाऱ्या गिफ्टचा खुलासा करण्यात आला.
मागील वर्षी होती एक लाख डॉलर किंमत : गेल्या दोन दशकांपासून मार्केटिंग एजन्सी डिस्पेक्टिव्ह एसेट्स उत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीसाठी खास प्रकारच्या गुडी बॅग्स बनवत आहेत. एजन्सीने त्यांची किंमत काय आहे हे सांगितले नाही, परंतु गेल्या वर्षी त्यांची किंमत एक लाख डॉलर्सच्या जवळ होती.
यावेळी गुडी बॅगमध्ये आहे याचा समावेश : एजन्सीने यंदा दिल्या जाणा-या गुडी बॅगविषयीची माहिती शेअर केली आहे. सीनेट डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या बॅगेत मिलीयानाचे क्रिस्टल इयररिंग्ज, 24 कॅरेटचे सोन्याचे पेन आणि 12 दिवसांची क्रूझ ट्रिप (किंमत - 78 हजार डॉलर्स) यांचा समावेश आहे. नामांकन मिळालेल्या व्यक्तींना मेडीटेशन हेड बँड आणि यूरिन कलेक्टर देखील देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त एक वर्षाचे ‘लिवइटअप’ (LiveItUp) चे सदस्यत्व देण्यात येणार आहे.
अन्नापासून उपचारांपर्यंत : यावर्षीच्या स्वॅग बॅगमध्ये मील किट, न्यूट्रीशन बार, अरोमाथेरपीचे गिफ्ट सेट देखील देण्यात येणार आहेत. या सेटमध्ये स्लीप सपोर्ट रोलबॉल, हनी मिंट लीप बाम आणि बॉडी ऑइल देण्यात येणार आहे. एजन्सीचे संस्थापक लॅश फेरी म्हणाले, आम्ही या गिफ्ट बॅगची किंमत अधिकृतपणे देत नाही आहोत. परंतु हे आतापर्यंतचे बेस्ट असेंबल आहे.
हे देखील मिळू शकते
- गोल्ड सिल्वर मून ब्रेसलेट
- 10 खासगी ट्रेनिंग सेशन
- जॉन थॉमन यांचे स्टेन्ड ग्लास पोट्रेट
- कॉकटेल-मॉकटेलमध्ये वापरण्यात येणारे सीरप
- 25 हजार डॉलरपर्यंतची बोटॉक्स ट्रीटमेंट
- स्पेनच्या लाइट हाऊसमध्ये स्टे
- ओल्ड स्पाइसचे डियोड्रंट
- बुलेट प्रूफ सिक्योरिटी डोअर
- वकीकी हॉटेलमध्ये 5 रात्रींचा मुक्काम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.