आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गूढ आवाजाने उस्मानाबाद हादरले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : जिल्ह्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून, मंगळवारी (दि.१९) दुपारी १.४० वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, भूकंपमापण केंद्रावर भूकंपाची नोंद न झाल्याने वारंवार होणाऱ्या आवाजाप्रमाणेच हा गूढ आवाज असल्याचे सांगण्यात येत होते. या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही, हे विशेष.


उस्मानाबाद शहरासह तुळजापूर, लोहारा आदी भागात मोठा गूढ आवाज झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उस्मानाबादेतही मोठा आवाज झाल्याने भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, हा आवाज भूकंपामुळे नसल्याचे लातूरच्या भूकंपमापण केंद्रातून सांगण्यात आले.


लोहारा शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास गूढ आवाज झाला. या अचानक अालेल्या या गूढ आवाजामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पत्रे तर काहींच्या दुकानातील काचा हादरल्याचे सांगण्यात आले. जमिनीतून स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. या आवाजाने घरावरील पत्रे हादरले. तर काहीजण घाबरून घरातून बाहेर पळत आले. अचानक झालेल्या या आवाजामुळे नागरिकांत भूकंप झाल्याची चर्चा होती. त्यामुळे लातूर येथील भूकंपमापक केंद्रातील अधिकारी अभिजित बोरडेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता भूकंपमापन केंद्रात याबाबत नोंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

या गावांत ऐकू आला मोठा गूढ आवाज
तालुक्यातील कानेगाव, माकणी, सास्तुर, होळी, उदतपूर, सालेगाव, एकोंडी, कोंडजीगड, धानुरी, जेवळी, कास्ती, नागूर, भातागळी, मार्डी, हिप्परगा, नागराळ, उंडरगाव आदी परिसर गूढ आवाजाने हादरला.
 

बातम्या आणखी आहेत...