आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट येताच शहामृग वाळूत तोंड लपवतात हे सत्य की असत्य, जाणून घ्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रूची चाहूल लागताच किंवा एखाद्या धोक्याची जाणीव होताच ऑस्ट्रिच म्हणजेच शहामृग वाळूत किंवा जमिनीत आपले तोंड लपवतो, असे म्हटले जाते. पण हे पूर्ण तथ्य नाही. खरे म्हणजे शहामृगाच्या अशा वर्तणुकीमागे वेगळे कारण आहे. इतर सजीवांप्रमाणेच शहामृगालाही जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. वाळूत किंवा जमिनीतच तोंड लपवून ठेवल्यास तो जगू शकणार नाही. 


निसर्गप्रेमी आणि लेखक डॉ. किशोर पवार म्हणतात, अनेक म्हणींद्वारे चुकीच्या समजुती पसरवल्या जातात. अशीच एक चूक शहामृगाबद्दलही पसरवलेली आहे. शहामृग वाळू किंवा मातीचे खड्डे खोदून त्यात अंडी दडवतात. काही तासांच्या अंतराने ते अंडी पाहत राहतात. असे केल्याने अंडी उबवण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश आणि ऊब मिळते. वेगवान वारे किंवा वादळात शहामृग वाळूत तोंड खुपसून अंडी सुरक्षित आहेत की नाही, हे पाहतात. त्यामुळेच संकट किंवा वादळाच्या वेळी शहामृग वाळूत तोंड लपवतात, ही म्हण प्रचलित झाली. दुसरे कारण म्हणजे या पक्ष्यांचे शरीर मोठे असते. त्यांना जास्त अन्नाची गरज असते. त्यामुळे अन्नाच्या शोधात ते नेहमी मान खाली घालूनच चालतात. 


शहामृग भित्रे नसतात : स्वरक्षणासाठी शहामृगांना मजबूत पायांनी किक मारता येते. यामुळे वाघाचाही मृत्यू होऊ शकतो. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी ते ताशी 70 किमी वेगाने धावू शकतात. शहामृग प्रामुख्याने अाफ्रिकेतील जंगलांमध्ये अाढळतात. 

बातम्या आणखी आहेत...