आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कुमुद दास
मुंबई/नवी दिल्ली - देशातील दोन मोठ्या बँका एसबीआय आणि बँक ऑफ इंडियाच्या गृह-आॅटो कर्ज स्वस्त केल्यानंतर अन्य बँकांनीही असेच पाऊल उचलण्याची आशा वाढली आहे. एसबीआयने शुक्रवारी एमसीएलआर ०.०५% घटवून ७.८५% करण्याची घोषणा केली. यामुळे एसबीआयचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होईल. नवे दर १० फेब्रुवारीपासून लागू होतील. याच पद्धतीने बँक ऑफ इंडिया(बीआेआय)नेही आपल्या एमसीएलआरमध्ये ०.१०% कपातीची घोषणा केली आहे.
बँकिंग सूत्रानुसार, एसबीआयनंतर आता अन्य बँकही आपले गृह, वाहन कर्जासह रिटेल कर्जाच्या दरात ०.१० पर्यंत कपात करू शकते. मात्र, बँक रिटेल कर्जाचे दर घटवण्याआधी आपल्या ठेवीचे दर कमी करेल. त्यासाठी बँकांची आपआपली अॅसेट लायबिलिटी कमेटी(अल्को) लवकरच बैठक बोलावून कर्ज आणि ठेवीच्या दरातील दुरुस्तीबाबत निर्णय घेईल. एखाद्याने ३० लाख रुपयांचे कर्ज ३० वर्षांसाठी घेतले आहे आणि बँक कर्जाच्या दरात ०.१०% कपात करत असेल तर त्याचा ईएमआय २१० रु. कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी या वर्षअखेर पतधोरणात सलग दुसऱ्यांदा रेपो दर ५.१५% वर जैसे थे ठेवला. मात्र, कर्ज स्वस्त करण्यासाठी पावले उचलली होती. याअंतर्गत बँकांसाठी एक लाख कोटी रुपयापर्यंतच्या रकमेसाठी लाँग टर्म रेपो(एक ते तीन वर्षे)ची घोषणा केली. यामुळे व्यावसायिक बँकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे स्वस्त झाले. यासोबत रिझर्व्ह बँकेने बँकांच्या कॅश रिझर्व्ह रेशो(सीआरआर) कायम ठेवण्यासाठी नियम शिथील केले आहेत. प्रत्येक बँकेस एकूण रोकडचा निश्चित हिस्सा रिझर्व्ह रेशो(सीआरआर)नुसार रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. सध्या सीआरआर दर ४% आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार बँक आपल्या गंगाजळीतील अशी रक्कम जी २१ जानेवारी ते ३१ जुलैदरम्यान किरकोळ कर्ज वाटपात वापरली असेल, ती रक्कम कॅश रिझर्व्हच्या कक्षेबाहेर राहील. यामुळे बँकांसाठी कर्ज वाटपासाठी पैसा जमा करण्याची गुंतवणूक कमी असेल. गृह, वाहन आणि एसएमईला कर्ज वाटपासाठी त्यांच्या हातात जास्त रक्कम असेल.
बँक ऑफ इंडियाचे गृह-वाहन कर्ज स्वस्त झाले
बँक ऑफ इंडियाने एमएसएलआरमध्ये ०.१०% कपात केली. नवे दर १० फेबुवारीपासून लागू होतील. यामुळे बँकचे वाहन, गृह कर्जासह किरकोळ कर्ज स्वस्त होतील. बँकेचे एमडी व सीईओ ए.के. दास यांनी ही माहिती दिली.
१० फेब्रुवारीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो
बँक ऑफ बडोदा(बॉब)चे मुख्य अर्थतज्ञ समीर नारंग म्हणाले, बँक रिटेल कर्जाच्या दरांत ०.०५-०.१०% पर्यंत कपात करू शकते. मात्र, यामध्ये सध्या काही अवधी लागू शकतो. कारण, सध्या सर्व कर्ज एमसीएलआर आधारित आहे. यासंदर्भातील निर्णय संबंधित बँकेच्या बैठकीत होईल. बँक ऑफ बडोदाच्या कर्जविषयक समितीची बैठक १० फेब्रुवारीला होणार आहे.
अलाहाबाद बँक १० मार्चला निर्णय घेईल
अलाहाबाद बँकेचे ईडी राज गोपाल यांनी सांगितले की, बँकेने एक महिना आधी रिटेल कर्जाच्या दरात ०.०५% ची कपात केली आहे. त्यामुळे बँक दर कपातीचा निर्णय आगामी १० मार्चला होणाऱ्या अल्कोच्या बैठकीत होईल. यादरम्यान बँक पाहील की, किती कपात व्यवहार्य असेल. कर्जाचे दर कमी झाल्यास एफडी दरांतही कपात करावी लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.