आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला मिळणारी मराठा समाजाची मते राष्ट्रवादीकडे वळाली, मात्र आमची लढत थेट भाजपसोबत - प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भाजपला मिळणारे मराठा समाजाचे मतदान काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले आहे. यामुळे भाजपच्या मिळणारे मतदान कमी होणार आहे. असे असले तरी आमची थेट लढत ही भाजपसोबत असणार असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 

आंबेडकर म्हणाले की, जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हाला आशादायक निकाल लागण्याची अपेक्षा आहे. भाजप-सेना यांनी युती केली असली तरी त्यांच्यात म्हणावे तसे जुळत नाही. याचा नक्कीच फायदा होणार असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी बोलुन दाखवला.