आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमच्या पोरानं लयच बेकार काम केलं साहेब, आरोपीच्या आईची भावना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगणघाट - “आमचा पोरगा असं काही करील हे स्वप्नातबी वाटलं नव्हतं. पोरानं लयच वंगाळ काम केलं साहेब,’ असे सांगताना हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळेची आई इंदिरा यांच्या डोळ्यात पाणी आले. हिंगणघाटपासून १५ किमीवर आरोपीचे गाव आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून विकेश घरात काहीच बोलत नव्हता. त्याचे काहीतरी बिनसले आहे, असे वाटत होते. पण, अंदाज लागत नव्हता. काह्यचं तरी टेन्शन असल्यावानी वागत व्हता. ड्यूटीवरून घरी आला का जेवण करून झोपून जात होता. पण, असं करील असं वाटलं नव्हतं. लय बेकार काम केलं साहेब, असे इंदिरा नगराळे म्हणाल्या. दुसरीकडे  आरोपीची  पत्नी प्रिया नगराळे बसली होती.


दरोडा गावातील नागरिक संतप्त
 :


दरोडा तसेच आसपासच्या गावातील संतप्त नागरिक, महिला तसेच महाविद्यालयीन मुली मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या वेळी सहभागी झालेल्या तरुणांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.