आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पुन्हा अग्नितांडवः वांद्रेतील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागली, 60 जणांना सुखरूप बाहेर काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील वांद्रे परिसरात असलेल्या एमटीएनएलच्या 9 मजली इमारतीला सोमवारी अचानक आग लागली. आग ज्या ठिकाणी लागली तेथे किमान 100 लोक अडकले. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे 14 बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्वांनाच सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ही आग प्रामुख्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोबतच, कुठल्याही प्रकारची जीवितहानी यात झालेली नाही.

 

प्राथमिक माहितीनुसार, या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली. सोबतच तिसऱ्या मजल्यावर सुद्धा आगडोंब उडाला. या घटनेच्या अवघ्या तासाभरातच 25 हून अधिक लोकांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. यानंतर आग अख्ख्या फ्लोअरवर पसरली आणि वेळीच अग्निशमन तसेच पोलिसांना बोलावण्यात आले. हा परिसर अतिशय गजबजलेला असल्याने येथे मोठा ट्रॅफिक जॅम सुद्धा झाला. यानंतर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना इमारतीपासून दूर करत वाट मोकळी करून दिली.