आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवेग, मद्यामुळे 4500 बळी; आता इंटर सेक्टर वाहनांतून पडेल'दंड'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : राज्य, नॅशनल, एक्स्प्रेस, इतर मार्गावर चालू वर्षातील एप्रिल महिन्यापर्यंत ४१६३ अपघातांतून ४ हजार ५२० जणांचा बळी गेला. ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जास्त लोकसंख्या असलेल्या व महामार्ग जात असलेल्या अशा जिल्ह्यांसाठी ९६ 'इंटर सेक्टर व्हेइकल' वाहने देण्यात आली आहेत. या वाहनातूनच वेग पाहण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्पीड गन, मद्य प्राशनाचे तपासण्यासाठी ब्रेथ अॅनालायझर, काळ्या काचाचे प्रमाण मोजण्यासह इतर सुविधा या वाहनात आहे. वाद होऊ नये म्हणून आतूनच उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंड लावला जाणार आहे. अपघात होऊ नये म्हणून मद्यपीच्या हातातील वाहन नेण्याची सुविधा असल्यामुळे अपघातांवर काही प्रमाणात का होईना आळा बसण्यास मदत होणार आहे.


दळणवळण सुखकर होण्यासाठी तसेच विकासात्मक दृष्टीने विविध रस्ते हे महामार्गांना जोडले जात आहेत. महामार्गांवर वाहनधारकांना त्यांचे धावण्याची वेगमर्यादा दिलेली आहे. परंतु वाहने चालवत असताना अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होतात. यामुळे अशा वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने आता ब्रेथलायझर, स्पीड गन मोजणारे अत्याधुनिक यंत्रणा असलेली वाहने तयार केली आहेत.


ती वाहने ज्या जिल्ह्यांतून महामार्ग जातात, लोकसंख्या जास्त आहे, अशा जिल्ह्यांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ९६ वाहने दिली असून, वाहनांतून कारवाई करण्यासाठीचे त्या-त्या पातळीवर प्रशिक्षणही देणे सुरू आहे. सध्या ही वाहने जालना, औरंगाबाद, साेलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, नागपूर, गडचिरोली आदी ठिकाणी देण्यात आली आहेत. या वाहन चालकांचे प्रशिक्षण सुरू अाहे.


प्रशिक्षणानंतर लगेच या वाहनांमार्फत हायवे मार्गावर कारवाया केल्या जाणार आहेत. ज्या हायवे मार्गावर जास्त अपघात होत आहेत, तसेच लोकसंख्येनुसार ही वाहने टप्प्याटप्प्याने देत असल्याची माहिती पुणे येथील हायवे पोलिस महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जालना जिल्ह्यातही दोन वाहने आली असून, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या हस्ते या वाहनांचे उद्घाटन झाले आहे. या वाहनांसाठी वाहतूक शाखेचे पीआय चत्रभुज काकडे, एपीआय सुरेश भाले तसेच वाहतूक महामार्ग पोलिस कारवाया करणार आहेत.

मद्य प्राशन केल्याचे मानांकन जास्त असल्यास पोलिस वाहन ताब्यात घेणार
जालन्यात दोन वाहन

राज्यभरात एक्स्प्रेस, नॅशनल हायवे, स्टेट हायवेवर जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत ३ हजार अपघातांमध्ये २ हजार जणांचा मृत्यू झाला. ज्या जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या व राज्य महामार्ग जाणाऱ्या शहरांच्या ठिकाणी 'इंटर सेक्टर व्हेइकल' सुरू करण्यात आल्या. या व्हेइकल चालकांचे प्रशिक्षण सुरू आहे. वाहतूक, हायवेला एकेक वाहन. जालन्यात दोन वाहने देण्यात आली. या व्हॅनमध्ये ब्रेन अॅनालायझर, स्पीड गन असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहनधारक जाऊन कारवाई करणार आहे. मद्य प्राशन केल्याचे मानांकन जास्त असेल तर पोलिस लगेच वाहन ताब्यात घेणार अाहे.
अत्याधुनिक वाहनाचा ब्रेथ अॅनालायझर तपासून शुभारंभ करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे.


तीन वर्षांत ४८ हजार ४५ जणांचा मृत्यू | २०१६ मध्ये ११७८० अपघात होऊन त्यात २२ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये ११ हजार ४५४ अपघात होऊन यात १२ हजार ५११ जणांचा तर २०१८ मध्ये १२०९८ अपघातांत १३ हजार २६१ जणांचा बळी गेला आहे. असा तीन वर्षात ४८ हजार ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालू वर्षातील एप्रिल महिन्यापर्यंत ४१६३ अपघात हेऊन यात ४ हजार ५२० जणांचा मृत्यू झाला.

जानेवारी ते एप्रिलपर्यंत महामार्गावर झालेले अपघात, मृत

मार्ग अपघात मृत गंभीर
एक्स्प्रेस 1243469
नॅशनल 11161222378
स्टेट 10341191301
इतर मार्ग 19462073717

सोर्स : हायवे पोलिस महाराष्ट्र राज्य.  

बातम्या आणखी आहेत...