आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविनोद यादव
मुंबई - मुंबईमधील धारावी या आशियातील सर्वात माेठ्या झाेपडपट्टीला येथील रॅपर्स कलाकारांनी एक नवीन ओळख दिली आहे. अलीकडेच गली बाॅय या बाॅलीवूड चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन झाले आहे. हा चित्रपट झाेपडपट्टीतील रॅपल डिव्हाइन आणि नेजीवर आधारित आहे. सध्या या धारावी झाेपडपट्टीमध्ये युनायटेड, डाेपाडेलीज, सेव्हन बँटी, फाइव्हडाॅग्ज, एनिमीसारखे ५० पेक्षा जास्त रॅपर्स वा हिपहाॅप ग्रुप सक्रिय आहेत. येथे ९ जणांच्या धारावी युनायटेड ग्रुपचे करण अमीन म्हणाले, आमच्या ग्रुपने काला, गली बाॅय, हिचकी, अनुराग कश्यपचा जू यांसह अनेक चित्रपटांमध्ये रॅप किंवा हिपहाॅप गाणी गायली आहेत. धारावीत राहणाऱ्या तीन वेगवेगळ्या ग्रुपने मिळून धारावी युनायटेड नावाचा ग्रुप तयार केला आहे. आमच्या रॅपर्सना साेशल मीडियावर २५ हजार लाेकांनी पसंती दिली आहे. या ग्रुपने हिचकी चित्रपटात केलेला ‘मॅडम जी गाे इझ’ हा रॅप युवकांमध्ये खूपच लाेकप्रिय हाेत आहे. धारावीत राहणारे हिप हाॅप ट्रेनर आकाश धनगर म्हणतात, मूळ पंजाबचे राहणारे अनिवासी भारतीय नेत्रपाल सिंह बंदेशा ऊर्फ हिरा यांनी धारावीत येऊन मला व अनेक युवकांना हिपहाॅप डान्स शिकवला. त्याआधी आमचा ग्रुप काेणत्याही नावाशवाय धारावीच्या गल्लीबाेळात डान्स शिकवत हाेता. धनगर म्हणाले, स्लमडाॅग मिलेनिअरमध्ये केलेले धारावीचे चित्रण मला याेग्य वाटले नाही म्हणून मी ग्रुपचे नाव स्लमगाॅड ठेवले व याच नावाने धारावीतल्या लाेकांना डान्स शिकवत आहे. त्यांनी शिकवलेल्या मुलांनी इंडियाज गाॅट टॅलेंट स्पर्धेत चमक दाखवली. हाॅलीवूडचे दिग्दर्शक डॅनी बाॅयल यांनी धारावीच्या झाेपडपट्टीतील मुले केंद्रस्थानी ठेवून स्लमडाॅग मिलेनिअर चित्रपटाची निर्मिती केली व ऑस्कर पुरस्कार जिंकला. येथे ४०० चाैरस फूट जागेत अभिनय, नृत्य व गायनाचा क्लास घेणारे ५८ वर्षांचे बाबुराव लाड म्हणाले, धारावीत आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. येथील सहावीतील मनीषा मैत्री या विद्यार्थिनीने नेटफ्लिक्सच्या लैला वेबसिरीजमध्ये रूप नावाची भूमिका केली. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी १९९३ मध्ये धारावीत चित्रपट केला. चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी १९८७ मध्येच धारावीचा डाॅन वरदराजन मुदलियारवर तामिळ चित्रपटाची निर्मिती केली. धारावीमध्येच १९८८ मध्ये दयावान चित्रपटाचे शूटिंग झाले. रजनीकांत, नाना पाटेकर यांचा काला व अमिताभ बच्चनच्या अग्निपथचे शूटिंगही धारावीत झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.