आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे फुकट जेवण मिळावे म्हणून वृद्ध टाकायचा पाल, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या 7500 हून अधिक तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रेल्वेच्या जेवणात वारंवार पाल आढळण्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. सुरेंद्र पाल नावाच्या एका वृद्धाची हातचलाखी पकडली गेल्यानंतर अशा तक्रारीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यास सूचना दिल्या आहेत. फुकटचे जेवण मिळावे म्हणून तो खिशातून पाल टाकायचा.

 

सुरेंद्र पाल (70) याने 14 जुलै रोजी जबलपूर स्टेशनवर समोसा खाल्ल्यानंतर त्यात पाल सापडल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गंटकल रेल्वे स्थानकावर बिर्याणीत पाल सापडल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकारी वसंतकुमार शर्मा यांना याची माहिती समजली. तेव्हा त्यांनी गंटकल स्टेशनवरील व्हिडिओ मागवला. त्यात सुरेंद्र अधिकाऱ्यांना सांगत होते की, मी चुकीचे वागतो आहे. मानसिक अवस्था बरी नाही. मला रक्ताचा कर्करोग आहे. कृपया मला सोडा. रेल्वे अधिकारी त्याला पुन्हा रेल्वेची अशी फसवणूक करू नको, रेल्वे तुमच्या कुटुंबाप्रमाणेच आहे, अशी समज देत होते. रेल्वेत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या 7500 हून अधिक रेल्वे प्रवाशांच्या तक्रारी रेल्वे विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...