आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दरवर्षी घडतात 5 लाख अपघात, दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सरासरी 1.5 लाख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - देशात दरवर्षी सरासरी 5 लाख अपघात होत असतात. तसेच या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सरासरी आकडेवारी दिड लाखांपेक्षा जास्त आहे. सरकारकडून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात असतानाही अपघातांचे प्रमाण कमी होत नाहीत अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नागपूरमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात बोलत होते. देशभर एकाचवेळी सुरू करणाऱ्या या जनजागृती कार्यक्रमांची 17 जानेवारीला सांगता होणार आहे.

62% अपघातग्रस्तांचे वय 18 ते 35 वर्षे


कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी सरासरी 5 लाख अपघात घडतात. त्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांच्या मृत्यूची नोंद होते. त्यातही जवळपास 3 लाख लोक जखमी होतात. अशा अपघातांमुळे देशाचा जीडीपी 2 टक्क्यांनी कमी होतो. महत्वाचे म्हणजे, अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या 62 टक्के पीडितांचे वय 18 ते 35 वर्षे गटातील होते."

सरकारकडून प्रयत्न केले जात असतानाही हे आकडे कमी होताना दिसत नाहीत. परंतु, याच वेळी बोलताना गडकरींनी तामिळनाडू सरकारचे तोंडभर कौतुक केले आहे. तामिळनाडूने आपल्या राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण 29 टक्क्यांनी कमी केले आहे. या राज्यात अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. अशात लोकांना वाहतूक सुरक्षा नियम आणि उपाय सांगण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती मोहिमा राबवण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...