आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागील पाच वर्षामधील माझी विकासकामे स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न- नवाब मलिक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पाच वर्षांपुर्वी जी विकासकामे केलेली आहेत, त्या कामांना नव्या रंगात आणि नव्या ढंगात सजवून स्वतःच्या नावावर खपवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे नेते नवाब मलिक यांनी आपला विजय निश्चित असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.नवाब मलिक यांनी मांडला गाव, लेबर कॉलनी आणि टीएफआर याठिकाणी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. इथल्या लोकांची मुख्य समस्या पाणी आहे. मी जेव्हा या भागाचे प्रतिनिधीत्व करत होतो, त्यावेळी मी नवीन पाण्याची पाईपलाईन टाकून पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय झोपडपट्टीमध्ये वेगवेगळ्या असुविधा होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही मतांच्या फरकाने माझा पराभव झाला अशी खंतही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. 

इथल्या लोकप्रतिनिधीने लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे होत्या. काही अंशी सोडवल्या असे दाखवले मात्र मी केलेल्या विकासकामांच्या पाट्या बदलून कामे दाखवली असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. यावेळी मी लोकांपर्यंत पोचलो आहे. लोकांच्या मनात मी बसलो आहे. माझं ज्यापध्दतीने स्वागत मतदारसंघातील झोपडपट्टी आणि विभागात केले जात आहे यावरुन लोकांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे आणि हा बदल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने असेल असेही नवाब मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...