आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी \'नामकाे\'ची; तीनशेच्यावर मतदान केंद्रे, २२०० कर्मचारी, ६०० पाेलिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नामकाेचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रासह दाेन राज्यात असून जवळपास एक लाख ८७ हजार मतदार अाहेत, यामुळे लाखाे रुपयांचा खर्च निवडणुकीवर हाेणार अाहे. माेठी यंत्रणा निवडणूक प्रक्रियेकरिता उभी केली जात अाहे. जवळपास तीनशेच्यावर मतदान केंद्रे, त्यातही दीडशे मतदान केंद्र एकट्या नाशिक शहरात उभारली जाणार असून, सहकार विभागाचे २२०० कर्मचारी अाणि ६०० पाेलिस कर्मचारी या प्रक्रियेकरिता लागणार अाहेत. दरम्यान, अाज माघारीची अंतिम मुदत असल्याने प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली अाहे. बँकेच्या अावारात विविध ठिकाणांहून मतपेट्याही दाखल झाल्या अाहेत. 

 

शक्यतेप्रमाणे तीन पॅनल जरी मैैदानात कायम राहिले तरी सर्वसाधारण गटातून या पॅनल्सचेच ५४ उमेदवार उभे राहतील, अपक्ष उमेदवारही असतील, यामुळे या गटाची मतपत्रिका सर्वात माेठी म्हणजे वृत्तपत्राच्या अाकाराची असू शकते. या गटाकरिता स्वतंत्र मतपेटी तर महिला अाणि अनुसूचित जाती, जमाती गटातील मतदानाकरिता स्वतंत्र मतपेट्या ठेवल्या जातील. सहकार विभागाचेच कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असून याकरिता नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतून कर्मचारी उपलब्ध करण्यात अाले अाहेत. मतदारांना त्यांच्या परिसरात सहज मतदान करता यावे यादृष्टीने नियाेजनावर भर अाहे. याचदृष्टीने पालिका शाळांची पाहणी करण्यात अाली असून, काही जागाही निश्चित केल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारांची संख्या माेठी असल्यास दाेन दिवस मतमाेजणी सुरू राहण्याची शक्यता अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...