Home | National | Other State | Overloaded Tractor Crushed Whole Family only a girl child saved

मुलगी म्हणाली अंकल गाडी थांबवा अॅक्सीडेंट झाला आहे, जवळ गेली तेव्हा दिसले आई-वडील आणि बहिनीच्या शरीराचे विखुरलेले तुकडे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:14 PM IST

अॅक्सीडेंटमध्ये आधी आई-वडिलांचा आणि नंतर छोट्या बहिनीचा झाला मृत्यु, मोठी बहिन अंकलसोबत गाडीवर होती म्हणून वाचली.

  • Overloaded Tractor Crushed Whole Family only a girl child saved


    गुरदासपुर(पंजाब)- गुरदासपुर-श्रीहरगोविंदपूर मार्गावार शुक्रवारी रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा (आई-वडील आणि 3 वर्षाची मुलगी)मृत्यु झाला आहे. हे कुटुंब गाडीवरून भाच्चीच्या लग्नात जात होते तेव्हा वाळुने भरलेल्या एका ट्रकने त्यांना टक्कर मारली. या अपघातानंतर आरोपी ट्रक ड्रायवर फरार झाला आहे. आपघातात मरण पावलेल्या वीरूची मोठी मुलगी त्याच्या मित्राच्या गाडीवर होती म्हणून ती वाचली. अपघात इकता भयंकर होता की, वीरूचा जागीच मृत्यु झाला. ट्रकचे टायर वीरू आणि त्याची पत्नी बिंदू यांच्या चेहऱ्यावरून गेला, त्यामुळे त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला. तर त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीने रूग्णलयात अखेरचा श्वास घेतला.

    ट्रक ड्रायवरच्या चुकीमुळे झाला अपघात

    अपघाताचे मुख्य कारण ओव्हरलोडिंग ट्रक आहे. ट्रक पूर्ण भरलेला होता त्यामुळे त्याला मागून येणाऱ्या गाड्या दिसल्या नाहीत, आणि त्याने कुटुंबाला चिरडले. यानंतर ट्रक ड्रायव्हर तेथून पळून गेला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेत आहेत.

Trending