आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Overnight The New York City Shines With Light, 5200 Mega Vat Electricity Usage In Manhattan

रात्रभर विजेच्या प्रकाशाने लखलखत असते न्यूयॉर्क शहर, मॅनहटनमध्ये दरराेज 5200 मेगावॅट विजेचा वापर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका : अमेरिकेतील प्रमुख शहर असलेले न्यूयाॅर्क रात्रभर विजेच्या प्रकाशाने लखलखत असते. ५२ वर्ग किमी क्षेत्रात विस्तारलेल्या मॅनहटनमध्ये दरराेज रात्री ५२०० मेगावॅट वीज वापर हाेत असताे. वीजपुरवठा कंपनीचे नियाेजन संचालक जाॅन कटुओगाेने यांनी दिलेल्या माहितीनुसार ९९% वीज रात्रीच्या वेळी वापरली जाते. २० मजली इमारती रात्री प्रकाशमान ठेवणे आवश्यक असते, अन्यथा अशा इमारतींना धडकल्याने विमान अपघाताची शक्यता अधिक असते.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या नियमानुसार २०० फूट उंच किंवा २० मजली इमारतीवर प्रकाश असणे आवश्यक आहे. मॅनहटनच्या काही इमारतींच्या सर्वाधिक उंच भागावर लाल दिवा पेटता असताे. सामान्यत: पांढऱ्या शुभ्र रंगाने चकाकणारी एम्पायर स्टेट बिल्डिंग हॅलाेविनच्या दिवशी केशरी, ईदच्या दिवशी हिरव्या आणि बास्केटबाॅल टीम न्यूयाॅर्क निक्ससाठी निळ्या किंवा केशरी रंगाने झगमगत असते. एम्पायर स्टेट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी मल्किन म्हणाले, २०११ मध्ये टाॅवरच्या बाह्य भागातील यंत्रणा बदलली. नियंत्रण प्रणालीद्वारे १ काेटी ६० लाख कलर काॅम्बिनेशन पाहायला मिळतात. हे लाइट रात्री २ वाजता बंद हाेतात. शहरात जर रात्रीच्या वेळी एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असेल तर निर्मात्याच्या आग्रहावरून पहाटे चार वाजेपर्यंत दिवे सुरू असतात. या इमारतीच्या अंतर्गत असलेली वीज यंत्रणा ही सेन्सरयुक्त आहे.
 

बातम्या आणखी आहेत...