आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमधून सरत्या वर्षातील लक्षवेधी घटनांचा आढावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२५ जानेवारी - बिबट्याच्या जबड्यात पत्रकार : नाशिक शहरातील सावरकरनगर या उच्चभ्रू वसाहतीत सकाळी सातच्या सुमारास बिबट्या घुसला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर व छायाचित्रण करणाऱ्या पत्रकारांवर त्याने हल्ला चढवला. यात पत्रकार, वन कर्मचारी, नगरसेवकासह चाैघे जखमी झाले. सुमारे साडेतीन तास बिबट्याचा हा लाइव्ह थरार सुरू हाेता. - Divya Marathi
२५ जानेवारी - बिबट्याच्या जबड्यात पत्रकार : नाशिक शहरातील सावरकरनगर या उच्चभ्रू वसाहतीत सकाळी सातच्या सुमारास बिबट्या घुसला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर व छायाचित्रण करणाऱ्या पत्रकारांवर त्याने हल्ला चढवला. यात पत्रकार, वन कर्मचारी, नगरसेवकासह चाैघे जखमी झाले. सुमारे साडेतीन तास बिबट्याचा हा लाइव्ह थरार सुरू हाेता.

१४ सप्टेंबर : उदयनराजे भाजपत, शहांना पगडी

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भाेसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश केला. त्या वेळी राजेंनी पारंपरिक पगडी देऊन शहांचे स्वागत केले.