आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्‍या या निर्दयीपणामुळे जखमी होत आहेत ये‍थील गाढवं, जाणून तुम्‍हीही म्‍हणाल आता बस्‍स!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - ग्रीस भूमीपासून जवळपास 200 किमी दूर एजियन समुद्रात सेंटोरिनी नावाचे एक बेट आहे. हे एक छोटेसे व गोलाकार द्वीपसमूहामधील सर्वात मोठे द्वीप आहे. ज्‍वालामुखीय केंद्राचे हे अवशेष आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक सुट्टया साज-या करण्‍यासाठी येतात. एका रिपोर्टअनूसार येथे 1200 पर्यटक दरदिवशी फिरण्‍यासाठी येतात. अतिशय सुंदर पर्यटनस्‍थळ आहे. मात्र उंचावर असल्‍यामुळे येथील घरे तसेच हॉटेल्‍समध्‍ये पोहोचण्‍यासाठी पर्यटकांना गाढवावर स्‍वारी करावी लागते. सेंटोरिनी हे बेट डोंगराळ भागासाठी ओळखले जाते व येथे प्रवासासाठी विशेषकरून गाढवाचा वापर केला जातो. बहुतांश पर्यटक प्रवासासाठी येथेच गाढवाचाच वापर करतात. 

 

मात्र लठ्ठ पर्यटकांचे वजन आणि त्‍यामुळे पाठीवरील काठी पाठीला रगडत असल्‍यामुळे अनेक गाढवे जखमी होतात. येथील सामाजिक कार्यकर्तेही याविरोधात आहेत. या कामासाठी क्रॉस बीड गाढवाचा वापर गेला जावा, अशी त्‍यांची मागणी आहे. क्रॉस बीड गाढव हे अधिक उंच आणि सामर्थ्‍यशाली असतात. तसेच गाढवाच्‍या पाठीवर त्‍याच्‍या वजनाच्‍या 20 टक्‍के वजनच ठेवले जावे. त्‍यांवर 50 किलोहून अधिक वजन ठेवू नये, अशीही त्‍यांची मागणी आहे. मात्र हे सर्व ठरवण्‍यासाठी येथे सध्‍या कोणीही नाही. त्‍यामूळे गाढवांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. येथे काही मालिक नियमांचे पालन करणारेही आहेत. मात्र काही मालक केवळ अधिक पैशांच्‍या लोभापायी गाढवांचा असा अमानूष छळ करतात. 

 


   

बातम्या आणखी आहेत...