आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओवेसी ताेडणारे, तर मी जाेडणारा : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय मुस्लिमांना कलम ३७० च्या मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन आेवेसी डायनामाइट लावून ताेडण्याचे काम करतात. मी मात्र मुस्लिमांना जाेडण्याचे काम करत असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास दिलेल्या भेटीत व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर मागील पाच वर्षांचा कालावधी सर्वाधिक शांततेचा राहिल्याने भारताचा उल्लेख लिंचिस्थान असा करू नये, असे आवाहन हुसैन यांनी केले.  

जम्मू-काश्मीरशी संंबंधित कलम ३७० कधी रद्द करणार असे विचारून आम्हाला भंडवून साेडले जात हाेते. आम्ही कलम रद्द केल्यानंतर आता देशभर केवळ कलम ३७० वर भाजप बाेलत असल्याचे प्रश्न विचारले जात आहेत. भाजपमध्ये मुस्लिम लाेकप्रतिनिधी नसल्याची करण्यात येणारी विचारणा निरर्थक असल्याचे सांगत हुसैन यांनी आरीफ बेग, मुक्तार अब्बास नक्वी आणि आपण स्वत: तीन वेळा लाेकसभेला निवडून आलाे आहाेत. माॅब लिंचिंगवर प्रश्न विचारणाऱ्यास देशात देशद्राेही ठरवले जात असल्याबद्दल विचारल्यावर हुसैन यांनी भारताला लिंचिस्थान म्हणण्याचा अधिकार कुणालाच नसल्याचे सांगितले. 
 

सीएम पद, नाे व्हॅकन्सी
अमित शहांसमोर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी झाली हाेती. याबाबत हुसैन म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते आपल्या नेत्यात भविष्य बघत असतात. लाेकसभा, विधानसभा आणि वॉर्डापर्यंत हे सुरू असते.  बिहारमधून शाहनवाज यांना पंतप्रधान करण्याची मागणी झाली तर, असे विचारले असता हुसैन म्हणाले की, पंतप्रधानपदासाठी कुठेच आता व्हॅकन्सी नाही. महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदासाठी व्हॅकन्सी नाही, फडणवीस यांचेच नेतृत्व असेल, असे  ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...