आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर : दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयातून घुबड चोरी होण्याचे प्रकार समोर येऊ लागतात. अशाच प्रकराची एक घटना पंजाबच्या बठिंडा येथील बीड तलावाजवळील प्राणिसंग्रहालयात घडली आहे. येथून 2 घुबडांची चोरी झाली आहे. यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. चोरीच्या या घटनेकडे तांत्रिक आणि तंत्रक्रियांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांशी जोडून पाहिले जात आहे. या प्रकरणासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक कशाप्रकारे एक रात्रीतून मालामाल होण्यासाठी दिवाळीला घुबडांचा बळी देतात. एकविसाव्या शतकातही लोक अजूनही अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात ही धक्कदायक बाब आहे. जाणून घ्या, घुबडाशी संबंधित MYTH...


लुप्त होत चालेल्या प्रजातीतील जीव आहे घुबड
भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या अनुसूची-1 नुसार घुबड संरक्षित प्रजाती आहे. लुप्त होत चाललेल्या प्राण्याच्या श्रेणीमध्ये येते. यांची शिकार किंवा तस्करी केल्यास कमीत कमी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. एवढा कठोर कायदा असूनही देशातील काही राज्यांमध्ये दिवाळी काळात घुबडांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवाळी काळात घुबडांची तस्करी आणि प्राणिसंग्रहालयात चोरीच्या घटना समोर येऊ लागतात.


देवी लक्ष्मीचे वाहन आहे घुबड
तंत्र विद्या करणारे मांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी घुबडाचा बळी दिल्यानंतर याचे पंजे, पंख आणि नखांचा उपयोग करतात. असेही मानले जाते की, घुबड देवी लक्ष्मीचे वाहन आहे आणि दिवाळीच्या दिवशी घुबडाचा बळी दिल्याने लक्ष्मी घरात राहते.


दारू पिल्यानंतर घुबड मनुष्य भाषा बोलते
मांत्रिकांनुसार, घुबडांचा तंत्र क्रियेत वापर करण्यापूर्वी त्यांना दिवाळीच्या 45 दिवस आधीच दारू पाजली जाते आणि मांसची खाऊ घातले जाते. तंत्र मान्यतेनुसार दारू आणि मांस सेवन केल्यानंतर घुबड मनुष्याची भाषा बोलू लागतात. त्यानंतर घुबडाचा बळी दिल्यानंतर मांत्रिक याच्या अस्थी, पंख, डोळे आणि रक्ताने पूजा करतात. घुबडाचा पाय तिजोरीत ठेवल्याने धनामध्ये वृद्धी होते असे मानले जाते.


असे केल्यानंतर होतो मृत्यू 
घुबडाचे हृदय काढून मांत्रिक याचा वशीकरणासाठी उपयोग करतात. या विषयी अशीही अंधश्रद्धा आहे की, एखाद्या व्यक्तीने घुबडाला दगड मारला आणि तो घुबडाने पकडून एखाद्या तलाव किंवा नदीमध्ये टाकल्यास दगड मारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

बातम्या आणखी आहेत...