आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल्स होस्टेलमध्ये मालक सारखा चकरा का मारतो, मुलींना आला संशय; मग समोर आले हे धक्कादायक रहस्य !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूच्या चेन्नईत एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये जागोजागी गुप्त कॅमेरे लावलेले आढळले. या प्रकारानंतर होस्टेलच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. हे कॅमेरे बाथरूम आणि हॉलपासून ते होस्टेलच्या प्रत्येक कोपऱ्यावर लावलेले आढळले. ते इलेक्ट्रिकल सॉकेट्स, बल्ब, रॉड आणि अशाच काही जागांवर लपवण्यात आले होते. येथे राहत असलेल्या मुलींना होस्टेलमध्ये सतत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे संशय झाला, यानंतर लक्षपूर्वक त्यांनी तपासणी केली. मग गुप्त कॅमेऱ्यांचा खुलासा झाला.

 

होस्टेलमध्ये प्रत्येक जागी लावलेले होते कॅमरे
- ही घटना थिलाई गंगानगर फर्स्ट स्ट्रीटवरील एका गर्ल्स हॉस्टेलची आहे. हे होस्टेल 48 वर्षीय संपथ राजच्या मालकीचे आहे. येथे 7 आयटी प्रोफेशनल्स तरुणी राहत होत्या.
- होस्टेलमध्ये सतत दुरुस्तीची कामे सुरू होती. आणि ते पाहण्यासाठी होस्टेल मालक नेहमी चकरा मारत होता. चेकिंगसाठी तो मुलींच्या रूम्स आणि हॉल एरियात जात-येत होता.
- येथे राहत असलेल्या मुलींना त्यांच्या या वागण्याचा संशय आल्यावर त्यांनी रूम आणि बाथरूममध्ये बारकाईने तपास केला. तेव्हा त्यांना इलेक्ट्रिकल सॉकेट्स, बल्ब आणि रॉडमध्ये हिडन कॅमेरे लावलेले आढळले.
- हे कॅमेरे होस्टेलच्या बाथरूम, हॉल आणि रूमसहित प्रत्येक जागेवर होते, जे डागडुजीच्या नावावर फिट केले होते.

 

कॅमेरे सेट करण्यासाठी मारत होता चकरा...
- पोलिस अधिकारी म्हणाले की, संपथ कॅमेऱ्यांची पोझिशन बदलण्यासाठी सारखा होस्टेलमध्ये चकरा मारत होता. जेणेकरून त्याला योग्य व्ह्यू मिळू शकेल. पण, मुलींना मात्र दुरुस्तीचा बहाणा करत होता.
- पोलिसांनी येथे राहत असेलल्या मुलींच्या तक्रारीच्या आधारे पूर्ण होस्टेलमध्ये लागलेले गुप्त कॅमेरे आणि त्यातील फुटेज जप्त केले आहे. दुसरीकडे, आरोपी होस्टेल मालक संपथलाही अटक करून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आरोपी होस्टेल मालकाचा फोटो...  

 

बातम्या आणखी आहेत...