आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाने 60 किलोचा दगड बांधून कुत्र्याला नदीत फेकले, महिलेने जीव धोक्यात घालून वाचवला कुत्र्याचा जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेने पाण्यात उडी घेऊन कुत्र्याला बाहेर काढले

नॉटिंघमशायर- इंग्लँडमधील तिसरी सर्वात मोठी नदी ट्रेंटणध्ये बुडत असलेल्या बेल्जियम शेफर्ड डॉग बेलाला एका महिलेने जीव धोक्यात घालून कुत्र्याला जीव वाचवला. पोलिसांनी सांगितल्यानुसार 50 ते 60 किलो वजनी दगड कुत्र्याच्या पायाला बांधून मालकाने त्याला नदीत फेकले होते.


नॉटिंघमशायरमधील फरंडनमध्ये सोमवारी सकाळी 8.45 वाजता जेन हार्पर आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला निघाली होती. तेव्हा तिच्या मैत्रिणीला पाण्यात कोणीतरी बुडत असल्याचा आवाज आला. त्यानंतर जेनने ला कुत्रा बुडत असल्याचे दिसले, तिने तात्काळ पाण्यात उडी मारुन कुत्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. किनाऱ्यावर आल्यावर तिला कुत्र्याच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे दिसले.

याबाबत जेन म्हणाली की, इतके निर्दयी कोणी कसे असू शकतो. मी कुत्र्याला बाहेरतर काढले आहे, पण किती दिवस तो जिवंत राहील हे सांगू शकत नाही. त्यानंतर जेनने कुत्र्याला वेटरनरी डॉक्टरांकडे नेले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली. पोलिसांनी सर्वांना अपील केली आहे की, याबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी सांगावे.

बातम्या आणखी आहेत...