आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाबुल - प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या बस होत आहेत दहशतवादग्रस्त अफगाणिस्तानात बदलाच्या वाहक. प्रत्येक आठवड्यात दोन बस काबूलच्या बाजारात आणि शाळांमध्ये जातात. मात्र, यात प्रवाशांऐवजी पुस्तके असतात, जी काही कारणांमुळे पुस्तक वाचू शकत नाहीत अशा भावी पिढीचे जीवन बदलण्याचे महत्त्व ओळखतात. दहशतीने ग्रस्त मुले, तरुणांपर्यंत चालते फिरते वाचनालय पोहोचवण्याचे व्रत स्वीकारले आहे ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या फ्रेश्ता करीमने.
फ्रेश्ताने शाळा, महाविद्यालयातील शिक्षणादरम्यान स्वत: पुस्तकांची कमतरता अनुभवली आहे. यामुळे शिक्षण पूर्ण होताच चार्माग्ज नावाच्या ना नफा तत्त्वावरील संस्था स्थापन करण्यास सज्ज झाली. २७ वर्षांची फ्रेश्ता सांगते की, शहरात अशा अनेक शाळा आहेत, ज्यात वाचनालय नाही. देशात गंभीर विचारांना चालना मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
युनेस्कोच्या आकड्यांनुसार अफगाणिस्तानात साक्षरतेचा दर जगात सर्वात कमी आहे. येथे १० पैकी केवळ ३ जण वाचू शकतात. याचे कारणही आहे. काबूलमधील बहुतांश खासगी शाळांमध्ये वाचनालय नाही आणि शहरात जी वाचनालये आहेत त्यात मुलांसाठी पुस्तके नाहीत.
फ्रेश्ता सांगते की, मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याचा बस सर्वात कमी खर्चिक आणि चांगला मार्ग आहे. चार्माग्जने त्या एका सरकारी कंपनीकडून भाड्याने घेतल्या आहेत. या संस्थेला या बस स्थानिक व्यावसायिक आणि समूहांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून मिळतात. त्यातूनच पुस्तके विकत घेतली जातात. मोबाइल सिनेमासारखी काम करेल अशी तिसरी बस संस्था तयार करत आहे. जेथे प्राणघातक स्फोट सतत होतात अशा भागात त्या जात नाहीत.
पुस्तकांचे चालत्या फिरत्या वाचनालयात दररोज ६०० पेक्षा जास्त मुले येतात.
सार्वजनिक वाहतुकीत पुस्तकांशी संबंधित अनोखा पुढाकार
> मार्व्हल कॉमिक्सला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंग्लंडमध्ये रेल्वे, बस, ट्रॉम आणि भूमिगत रेल्वेत कॉमिक पुस्तके ठेवली.
> बुखारेस्टमध्ये नुकतेच पोएट्री लायब्ररीचे आयोजन करण्यात आले. येथे प्रवासी कविता संग्रह वाचू शकतात आणि जॅज संगीत ऐकू शकतात.
> बीजिंगमधील दोन सबवे ट्रेनच्या डब्यांना ऑडिओ बुक लायब्ररीत बदलण्यात आले आहे. प्रवासी येथे पुस्तक डाऊनलोड करू शकतो. रेल्वेला वाचनालयासारखे बनवण्यासाठी डब्याच्या भिंतींना पुस्तके बुकशेल्फसारखे सजवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.