आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ozzy Osbourne Will Offer $25000 Rewards To Find Back Stolen Guitar Of His Late Friend Randy Rhoads

दिवंगत मित्राची चोरी झालेली गिटार परत मिळवण्यासाठी गायक ओजी ऑजबॉर्न जाहिर केले 25 हजार डॉलरचे बक्षिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्कः  ब्लॅक सब्बाथ या प्रसिद्ध बँडचे फ्रंटमन ओजी ऑजबॉर्नने आपल्या दिवंगत मित्राची चोरी झालेली गिटार परत मिळवण्यासाठी एक अपील केली आहे. त्याच्या या दिवंगत मित्राचे नाव रँडी रोहड्स आहे. ऑजीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी उत्तर हॉलिवूडमधील म्युसोनिया स्कूल ऑफ म्युझिक येथून रँडीची गिटार चोरीला गेली होती. रँडी रोहड्स हे मेटल गिटारिस्ट होते. त्यांनी ओस्बोर्नसोबत काम केले होते. रँडी यांचे 1982 साली वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी विमान दुर्घटनेत निधन झाले होते. 

ओजीने ठेवले 25 हजार डॉलचे बक्षिस 
ऑजीने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले, म्युसोनिया स्कूल ऑफ म्युझिक, जिथे रँडी गिटार शिकवायचा तेथून थँक्सगिव्हिंग नाइटला त्याची गिटार चोरी झाल्याचे तुमच्या ऐकिवात असेल. म्युसोनिया असे एक ठिकाण आहे जिथे रोहड्स फॅमिली रँडीविषयी मनमोकळेपणाने बोलते. ज्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, त्या त्याच्या कुटुंबीयांसाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे नक्कीच तुम्ही समजू शकता. जेव्हा मला कळले की, रँडीच्या या आठवणी कुणीतरी त्याच्या कुटुंबीयांपासून चोरल्या, तेव्हा मी खूप दुःखी झालो. त्यामुळे चोरी करणा-याला अटक आणि शिक्षा, किंवा सर्व वस्तूच्या परतीसाठी मी 25,000  डॉलरचे बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सामानाची छायाचित्रेही शेअर केली
ओजीने या पोस्टसोबत रँडीच्या चोरीला गेलेल्या इतर वस्तूंची नावे आणि छायाचित्रे शेअर केली आहेत. यामध्ये रँडीची पहिली इलेक्ट्रिल गिटार, ओरिजनल क्वाइट राइट गियर, सीरीज मार्शल हेड, डेलोरसचा पहिला ट्रम्पेट, रँडीची सर्व छायाचित्रे याचा समावेश आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...