आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोहत्येच्या आरोपींवर रासुका लावण्याचा कमलनाथ सरकारचा निर्णय चुकीचा होता, चिदंबरम यांची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मध्यप्रदेश सरकारच्या गोहत्येच्या आरोपींवर रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याच्या निर्णयाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी चूक ठरवले आहे. ते म्हणाले हे प्रकरण राज्य सरकारसमोर उपस्थित करण्यात आले आहे. एखाद्याकडून काही चूक झाली तर ती नेतृत्वाच्या लक्षात आणून द्यायची असा यामागचा उद्देश होता. 


काही दिवसांपूर्वीच खांडवामद्ये गोहत्या प्रकरणात अठक झालेल्या तीन आरोपींवर रासुका लावण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनीच कमलनाथ सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. 


सबरीमाला आणि रामजन्मभूमी वाद वेगळा 
दिल्लीमधील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीमध्ये एका पुस्तक प्रकाशनादरम्यान चिदंबरम यांनी अयोध्येत राम मंदिर आणि केरळच्या सबरीमाला वादावरही त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, राम मंदिर लोकांच्या आस्थेचा मुद्दा आहे तर समबरीमाला वाद हा एका परंपरेमुळे उदभवलेला आहे. 

 
सबरीमालाची परंपरा घटनात्मक मुल्यांच्या विरोधी 
चिदंबरम म्हणाले, मी स्वतः धार्मिक नाही पण मुद्दा असा आहे की, सबरीमालाच्या प्रथा आधुनिक घटनात्मक मुल्यांच्या विरोधी आहेत. तर अयोध्या ही भगवान श्री रामांची जन्मभूमी आहे. त्याच आस्थेपोटी काही लोक जमिनीची मागणी करत आहेत. तर एका वर्गाचे असे म्हणणे आहे की, शेकटो वर्षांपासून तेथे मशीद होती. आता प्रश्न असा आहे की, सुप्रीम कोर्ट अलाहाबाद हायकोर्टाने उपस्थित केलेला मुद्दा सोडवणार आहे की नाही. 

बातम्या आणखी आहेत...