आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी. चिदंबरम यांची सर्व ६ प्रकरणांमध्ये चौकशी; पत्नी, मुलगा, सूनही फेऱ्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - काँग्रेस नेते व देशाचे माजी अर्थमंत्री, गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधात भ्रष्टाचार व घोटाळ्याशी संबंधित ६ मोठी प्रकरणे सुरू आहेत. त्यांच्याशी संबंधित सर्व खटले कनिष्ठ तसेच उच्च न्यायालयात पडून आहेत. सर्वच प्रकरणांत सीबीआय, ईडी, आयटी चिदंबरम यांची चौकशी करत आहे. त्यांना समन्सही धाडण्यात आले आहे. तीन प्रकरणांत चिदंबरम यांना जामीन मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर भ्रष्टाचाराच्या ३ प्रकरणांत चिदंबरम यांच्यासह त्यांची पत्नी नलिनी, मुलगा कार्ती, स्नुषा आरोपी आहेत. मुलगा कार्ती सध्या जामिनावर आहे.

सीबीआय भ्रष्टाचाराशी संबंधित ३३९ प्रकरणांत ११६१ लोकांच्या विरोधात तपास करतेय
सीबीआय पंतप्रधान मोदींच्या झीरो टॉलरन्स धोरणानुसार काम करत आहे. सीबीआय जून २०१७ पर्यंत देशातील १४ बड्या नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचार व बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात तपास करत आहे. त्यात चिदंबरम यांच्याव्यतिरिक्त हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, राजद अध्यक्ष लालू यादव यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे. २०१७ मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नावरील उत्तरात याबद्दलची माहिती दिली होती. तेव्हा सीबीआयकडे भ्रष्टाचार, संपत्ती, फसवणुकीशी संबंधित ६ हजार ४१४ केस अंडर ट्रायल होते. त्यात ११५ नेत्यांचाही समावेश होता. भ्रष्टाचाराशी संबंधित ३३९ खटले १ हजार १६१ लोकांच्या विरोधात सुरू होते. त्यात ४८७ सरकारी कर्मचारी होते. 
 

आयएनएक्स मीडिया: सौद्याच्या बदल्यात मुलास मदतीचे आश्वासन
चिदंबरम यांच्यावरील पहिला आरोप आयएनएक्स मीडिया ग्रुपसंबंधी आहे. त्यानुसार ३०५ कोटी रुपयांचा विदेशी निधी घेण्यासाठी आवश्यक फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या (एफआयपीबी) मंजुरीत घोटाळ्याचा आरोप आहे. प्रकरण २००७ चे आहे. तेव्हा चिदंबरम अर्थमंत्री होते. आयएनएक्सच्या प्रवर्तक इंद्राणी मुखर्जी व त्यांचे पती पीटर मुखर्जी यांची ईडीने चौकशी केली. चिदंबरम यांनी मंजुरीच्या बदल्यात मुलगा कार्तीला परदेशी निधीच्या प्रकरणात मदत करण्यास सांगितले होते, असा दावा इंद्राणीने केला .
 

शारदा चिटफंड घोटाळा : १.४ कोटी रुपयांच्या लाचेचा आरोप
चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने शारदा चिटफंड घोटाळ्यात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर १.४ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. याच वर्षी फेब्रुवारी कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता.
 

काळा पैसा  : चिदंबरम, मुलगा कार्ती, पत्नी नलिनी, स्नुषा आरोप
चिदंबरम, पत्नी नलिनी, मुलगा कार्ती, स्नुषा श्रीनिधी यांच्यावर काळा पैसा तथा कर अधिनियम २०१५ अंतर्गत आरोप आहेत. मद्रास हायकोर्टाने २०१८ मध्ये आयटी विभागाद्वारे केस चालवण्याच्या मंजुरीसंबंधी आदेश रद्द केले होते. 
 

एअरसेल-मॅक्सिस सौदा : ३५०० कोटींंच्या सौद्याला परस्पर मंजुरी दिली 
दुसरे प्रकरण एअरसेल-मॅक्सिसदरम्यानचे ३५०० कोटी रुपयांच्या सौद्याशी संंबंधित आहे. त्यात सीबीआय तपास करत आहे. २००६ मध्ये मॅक्सिसची एअरसेलमध्ये १०० टक्के भागीदारी होती. चिदंबरम तेव्हा अर्थमंत्री होते. २ जीशी संबंधित प्रकरणात चिदंबरम व त्यांच्या कुटुंबावर हवाला केस सुरू आहे. परदेशी गुंतवणुकीच्या मान्यता देण्याची अर्थमंत्र्यांचे अधिकार सीमा केवळ ६०० कोटी रुपये आहे. असे असूनही ३५०० कोटी रुपयांचा सौदा कॅबिनेट समितीच्या परवानगीविना मंजूर करण्यात आला. 
 

हवाई घोटाळ्यात १७५ दशलक्ष डॉलरचा लाभ पोहोचवण्याचा आरोप 
ईडीने चिदंबरम यांना हवाई घोटाळ्यात २३ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स पाठवले आहे. २००७ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असताना १११ प्रवासी विमान खरेदी घोटाळ्यातही चौकशी सुरू आहे. प्रफुल्ल पटेल हेदेखील आरोपी आहेत. 
 

इशरतजहां केस : गृहमंत्रिपदाच्या काळात शपथपत्रावर खाडाखोड
चिदंबरम यांच्याविरोधात इशरतजहां प्रकरणाशी संबंधित शपथपत्रावर खाडाखोड करण्यासंदर्भात चौकशी दिल्ली पोलिसांत प्रलंबित आहे. शपथपत्रात खाडाखोड झाली. तेव्हा चिदंबरम गृहमंत्रिपदावर होते, असा आरोप आहे. 
 

भ्रष्टाचारासंबंधी ३३९ खटल्यांत ११६१ लोकांच्या विरोधात सीबीआयचा तपास 
2001 करुणानिधींना अटक जयललिता व करुणानिधी कट्टर विरोधक. जुलै २००१ मध्ये पोलिसांनी रात्री पावणेदोन वाजता करुणानिधींना घरातून अटक. 
 
2011, सुखराम
माजी दूरसंचारमंत्री व काँग्रेस नेता. दूरसंचार कंत्राट घोटाळ्यात नोव्हेंबर २०११ मध्ये अटक. 
 
2011, बी.एस. येदियुरप्पा : कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजप नेता. सरकारी जमीन घोटाळ्यात ऑक्टोबर २०११ मध्ये अटक.
 
2011, सुरेश कलमाडी :  संपुआ सरकारमध्ये क्रीडामंत्री व काँग्रेस नेता. राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात एप्रिल २०११ मध्ये अटक.
 
2011, अमर सिंह: माजी राज्यसभा सदस्य व माजी सपा नेता. कॅश फाॅर व्होट घोटाळ्यात सप्टेंबर २०११ मध्ये अटक.
 
2012, बंगारू लक्ष्मण : भाजपचे माजी अध्यक्ष. संरक्षण सौदा (तहलका स्टिंग). एप्रिल २०१२ मध्ये अटक.
 
 
2011, ए. राजा: यूपीए सरकारमध्ये दूरसंचारमंत्री व द्रमुक नेता. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात फेब्रुवारी २०११मध्ये अटक. 
 
2011, कनिमोझी : राज्यसभा सदस्य व द्रमुक नेता. टूजी घोटाळ्यात मे २०११ मध्ये अटक. तिहार तुरुंगात ठेवले.