आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी त्यांच्या इच्छेनुसार 5 टीकाकार निवडावे आणि त्यांच्यासोबत लाइव्ह टीव्ही शोमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यावीत- पी चिदंबरम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी माध्यमांसमोर येईन उत्तरे द्यावीत, अशी आमची इच्छा आहे

नवी दिल्ली- माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात आंदोलनावरुन मोदींना सल्ला दिला आहे. चिदंबरम म्हणाले की, 'मोदींनी आपल्या इच्छेप्रमाणे त्यांचे 5 टीकाकार निवडावे आणि टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्ते द्यावीत. यातून नागरिकांमध्ये या कायद्याबद्दल असललेली चुकीची मत दूर जातील. आशा करतो की, मोदी माझ्या या सल्ल्याला ऐकतील."

'लोकांच्या मनात नागरिकत्वाबद्दल भीती'

चिदंबरम पुढे म्हणाले की, "मोदी म्हणतात की, सीएए लोकांना नागरिकत्व देते. पण, अनेक लोकांना वाटते की यामुळे त्यांचे नागरिकत्व जाणार आहे. आमची अशी इच्छा आहे की, मोदींना माध्यमांसमोर यावे आणि देशातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत."

सोनिया गांधींनी भेदभाव करण्याचा आरोप लावला

सोनिया गांधींनी शनिवारी सीएएला भेदभाव आणि विभाजन करणारा कायदा म्हटले. पुढे त्या म्हणाल्या की, या कायद्याला देशातील लोकांना धार्मिक आधारावर विभाजीत करण्यासाठी आणले आहे. राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) देखील यासाठीच आहे.

बातम्या आणखी आहेत...