National / घसरलेल्या GDP वरुन पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर मारला टोमणा, कोर्टरुमबाहेर हाताचे बोटं दाखवत म्हमाले '5%'

चिदंबरम यांना सीबीआय कोठडी

Sep 03,2019 08:20:00 PM IST

नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेले देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम जीडीबीवरुन मोदी सरकरला टोला लगावला. जीडीपीमध्ये घट होऊन तो सहा वर्षातील निचांकी 5 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित हा जीडीपी 8 टक्क्यांवर होता.


न्यायालयातून बाहेर पडताच चिदंबरम यांना पत्रकारांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल विचारले असता, चिदंबरम यांनी कोसळलेल्या जीडीपीबाबत सांगताना, हाताची बोटे दाखवत 5 टक्के असे सांगितले. कोर्टाने चिदंबरम यांना गुरुवारपर्यंत सीबीआय कोर्टातच ठेवण्यास बजावले आहे. दरम्यान, काँग्रेसने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

चिदंबरम यांना सीबीआय कोठडी
सीबीआय कोठडीत असलेल्या चिदंबरम यांच्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्ट आता गुरुवारी करणार आहे. तोपर्यंत त्यांची सीबीआय कोठडी कायम राहील. चिदंबरम यांच्याकडून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तीवाद करत आहेत.

X