आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • P Chidambaram Slams Modi Govt Over Article 370, Says Kashmir Was Muslim Dominated

काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे मोदी सरकारने कलम 370 रद्द केले - माजी अर्थमंत्री पी चिदंबरम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल सरकारला फटकारले. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे मोदी सरकाने कलम 370 रद्द केले. तेथे जर हिंदू बहुसंख्य असते तर हा निर्णय घेतला नसता असे व्यक्तव्य त्यांनी चेन्नई येथे केले. 
 
पुढे बोलतांना ते म्हणाले, की जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे. भाजप सोडले तर याबाबत कोणालाच शंका नाही. ज्या लोकांना 72 वर्षांचा इतिहास माहीत नाही त्यांनी फक्त आपली ताकद दाखवण्यासाठी 370 हटवले. संविधानाच्या कलम 371 च्या अनेक कलमांअंतर्गत बऱ्याच राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे. 

आंदोलकांवर दबाव आणला
कलम 370 हटवण्याबाबत विरोध करण्याऱ्या हजारो आंदोलकांवर दबाव टाकण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार केला, अश्रू गॅस सोडण्यात आले. हे सर्व सत्य आहे. देशातील सात पक्षांनी कलम 370 रद्द करण्याबाबत समर्थन दिले यामुळे सुद्धा मी दुःखी आहे. 
 

पंतप्रधानांनी मोजकेच कायदे सांगितले
माजी अर्थमंत्र्यांच्या मते, पंतप्रधानांनी कलम 370 रद्द केल्यानंतर देशाला संबोधित केले. त्यांनी जम्मू-काश्मीरवर लागू नसलेल्या मोजक्याच कायद्याविषयी सांगितले. पण तेथे अद्यापही लागू असलेले 90 कायद्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो. 

5 ऑगस्ट रोजी राज्यसभेती केली होती शिफारस  
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 5 ऑगस्ट रोजी राज्यसभेत कलम 370 हटवण्याबाबतची शिफारस केली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुच्छेद हटवण्याची अधिसूचना जारी केली. आता जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दिल्ली प्रमाणे विधानसभा असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...