आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी.चिदंबरम यांनी गृहमंत्री असताना केले होते CBI च्या मुख्यालयाचे उद्घाटन, आता आरोपी म्हणून तेथेच काढावी लागली रात्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने अटक केली. यानंतर त्यांना दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आले. पी.चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना प्रमुख अतिथी म्हणून या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. आता त्यांच्यावरच या ठिकाणी आरोपी म्हणून रात्र काढण्याची वेळ आली. 
 

30 जून 2011 रोजी केले होते उद्घाटन 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सीबीआयची नवीन इमारत उभारण्यात आली. 30 जून 2011 रोजी तत्कालीन गृहमंत्री असलेले पी.चिदंबरम यांच्या हस्ते सीबीआयच्या नवीन इमारतची उद्घाटन करण्यात आले होते. 
उद्घाटनावेळी व्हिजिटर्स बुकमध्ये चिदंबरम यांनी लिहिले होते की, ''1985 पासून वेगवेगळ्या कारणांद्वारे सीबीआयसोबत जवळून काम केले आहे. या संस्थेची नवीन इमारत पाहून मला अभिमान वाटतो. भारताची प्रमुख तपास यंत्रणा बळकटीने वाढू शकेल आणि आपल्या प्रशासकीय यंत्रणेचा मजबूत आधारस्तंभ होईल अशी आशा आहे."

उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांनी या इमारतीची पाहणी केली होती. त्यांनी अगदी तळ मजल्यावरील गेस्ट हाउसच्या लॉक-अप सुविधादेखील बघितल्या होत्या. चिदंबरम यांना सध्या त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.