आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहारमध्ये वजन घटले, पी. चिदंबरम यांच्याकडून सप्लिमेंट्री डाएटची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुन्हा झटका बसला. तिहार तुरुंगात असलेले चिदंबरम आता तीन ऑक्टोबरपर्यंत तेथेच राहतील. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेथे सीबीआयने विशेष न्या. अजयकुमार कुहार यांच्याकडे कोठडी वाढवून मागितली. यास चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी विरोध केला. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांना १४ दिवसांच्या कोठडीचे आदेश दिले. सिब्बल म्हणाले की, त्यांच्या पक्षकारांना अनेक आजार असून त्यांचे वजनही घटले आहे. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी व सप्लिमेंट्री डाएट आ‌वश्यक आहे. कोर्टाने वैद्यकीय तपासणीला मान्यता दिली. 
 

चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक झाली होती  
आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर सीबीआयने २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांची कोठडीत चौकशी केली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने पाच सप्टेंबरला १४ दिवसांच्या कोठडीत तिहार  पाठवले होते. 

बातम्या आणखी आहेत...