आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • P Chidambaram's First Press Conference After His Release From Tihar Prison News And Updates

अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिहारमधून बाहेर येताच आज(गुरुवार) पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाना साधला. चिदंबरम म्हणाले की, वर्ष संपता-संपता विकासदर 5% झाला, तर आपण खूप भाग्यशाली ठरतोल. तत्पुर्वी चिदंबरम संसदेतही गेले. येथे ते म्हणाले की, मोदी सरकार आमचा आवाज दाबू शकत नाहीत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. ते म्हणाले की, चिदंबरम पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाने दिलेल्या अटी मोडत आहेत.
चिदंबरम पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेवर बोलण्याबाबत मौन बाळगले आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिशाभूल करणारे विधाने करण्यासाठी सोडले आहे. सध्याच्या सरकारकडे अर्थव्यवस्थेची जाण असलेल्या लोकांची कमतरता आहे. ज्यांना याची जाण होती, त्यांना पदावरून हटवले. अर्थव्यवस्था विस्तापित करण्याबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 75 लाख काश्मिरींना मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्या


चिदंबरम म्हणाले की, "मी काल रात्री 8 वाजता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकलो. स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार नाकारत 4 ऑगस्ट पासून अटक केलेल्या 75 लाख काश्मिरींना देखील मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्यावा ही माझी विनंती आहे. कारण नसताना नजरकैदेत ठेवलेल्या काश्मिरींची मला चिंता वाटते. सरकारने परवानगी दिली तर मला काश्मीरला जाऊन तेथील परिस्थिती पाहायची आहे, असे  त्यावेळी म्हणाले.