Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | paap-karma-shiv-puran

शारीरिक पापकर्मांपासून दूर रहा

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 07:40 PM IST

हिंदू धर्मग्रंथ शिव पुराणात चार शारीरिक पापकर्मांचा उल्लेख आहे.

 • paap-karma-shiv-puran

  हिंदू धर्मग्रंथ शिव पुराणात चार शारीरिक पापकर्मांचा उल्लेख आहे. या चार पापकर्मांपासून मनुष्याने सदैव दूर राहिले पाहिजे. ही चार पापकर्म कोणती आहेत हे तुम्हाला माहीत आहे...
  1. अपवित्र भोजनापासून दूर... शुद्ध आहाराने विचार आणि आचार पवित्र होतात. त्यामुळे शक्य तेवढे साधे, शाकाहारी आणि ताजे अन्न ग्रहण करणे चांगले. याउलट दूषित किंवा अपवित्र अन्न ग्रहण करणे आरोग्यासाठी घातक असते.
  2. हिंसा नको... धर्मशास्त्रांनी अहिंसेला सुखी जीवनाचा आधार मानले आहे. अहिंसा हे तत्त्व संवेदना, दया, करुणा या भावना जागवून प्राण्यांना स्नेहबंधनात जोडते. विज्ञानाच्या दृष्टीनेही निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी अहिंसा तत्त्व महत्त्वाचे ठरते.
  3. व्यर्थ कामापासून दूर रहाणे... आळस, निरर्थक गप्पा, वाईट परिणाम करणारी कामे यात वेळ आणि ऊर्जा नष्ट होते. यामुळे जीवनात दुख, निरोशा येते.
  4. दुस:याची संपत्ती न लाटने... लोभ, लालसा, स्वार्थ यांच्या प्रभावाने दुस:यांचे धन हडपणे. यामुळे आपले जीवन दुखमय होते.Trending