आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उद्योगाला केंद्राकडून ५५३८ कोटींचेे पॅकेज; ऊस उत्पादकांना दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- साखर उद्योग व ऊस उत्पादकांना दिलासा देत केंद्राने साखर उद्योगासाठी ५,५३८ कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली. यापैकी कारखान्यांना १,३७५ कोटी वाहतूक अनुदानाच्या रूपात मिळतील. याबाबतच्या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

 

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १३,५६७ कोटी थकलेले आहेत. आता शेतकऱ्यांना सरकारकडून आधीच्या ५.५० रुपये प्रतिक्विंटलऐवजी  प्रतिक्विंटल १३.८८ रुपयांचे उत्पादन साहाय्य देण्यात येणार आहे. 


जूनमध्ये ८,५०० कोटींचे पॅकेज :साखर कारखान्यांसाठी सरकारने जूनमध्येही ८,५०० काेटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यात कारखान्यांना इथेनॉलसाठी ४,४०० कोटी कर्जाचाही समावेश होता.


वाहतूक खर्च अनुदान : साखर कारखान्यांना निर्यातीसाठी बंदरापासून  असलेल्या अंतरानुसार प्रतिटन ३ हजार वाहतूक अनुदान देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...