आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडेगावच्या मदरशातील 67 मुलींना विषबाधा; दोघींची तब्येत नाजूक, इतर मुलींची प्रकृती स्थिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील राबिया बसरिया लिल बनात या मुलींच्या मदशातील ६७ मुलींना विषबाधा झाली. त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. यातील दोघींची तब्येत बिघडली असून इतर मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.   


मंगळवारी सिल्लेखाना येथे सलमान कुरेशी यांच्यातर्फे मुलींना संध्याकाळची दावत देण्यात आली होती. ६७ मुलींना एकाच टेम्पोत सिल्लेखान्यात आणण्यात आले होते. मुलींनी ७ वाजेच्या सुमारास बिर्याणी खाल्ली. त्यानंतर काही जणींना उलट्या व मळमळ सुरू झाली. मदरशात पोहोचल्यानंतर बहुतांश मुलींची प्रकृती खालावली. या वेळी परिसरातील नागरिकांनी जमेल त्या व्यवस्थेने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. बालरोग विभागाच्या वाॅर्ड क्रमांक चोवीसमध्ये ३१ तर आपत्कालीन लिथोट्रिप्सी कक्षात ३६ मुलींना दाखल करण्यात आले.