आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्याचे हसू पाहून आई-वडीलही झाले आनंदी, पण नंतर मुलाला घाईतच नेले डॉक्टरांकडे, अन् बसला मोठा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा व्यक्ती नेहमीच हसत असतो असे आपण अनेकदा त्याच्या कौतुकासाठीही म्हणत असतो. कारण हसणारा व्यक्ती कायम सर्वांना हवाहवासा वाटत असतो. त्यात एखादे लहान मूल जर कायम हसत असेल तर मग ते सर्वांचेच लाडके बनते. पण हेच हसू एखाद्याच्या त्रासाचे संकेत असेल तर. इंग्लंडच्या सोमरसेटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. 

    
सोमरसेटमधील जॅक हा दोन वर्षांचा मुलगा सारखा हसत होता. सुरुवातील त्याच्या आई वडिलांना त्याचे हसू पाहून आनंद झाला. त्यामुळे तेही त्याच्या हसण्याची मजा लुटत होते. पण त्यांच्या मुलाचे हसू थांबतच नव्हते. जेव्हा सलग 17 तास त्याचे हसू सुरुच होते, तेव्हा मात्र त्याच्या आई वडिलांना काळजी वाटली आणि घाईत ते जॅकला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यानंतर त्यांना जे समजले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. 

 

डॉक्टरांनी सांगितले हे कारण..
डॉक्टरांनी जॅकला तपासले. त्यानंतर त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यात सीटी स्कॅनमध्ये असे समोर आले की, त्या मुलाच्या मेंदूमध्ये एक लहानसा ट्यूमर होता. त्या ट्युमरमुळे या मुलाच्या मेंदूमध्ये सारखी हालचाल व्हायची आणि त्या हालचालीमुळे त्याचा हसण्याचे झटके यायचे त्यामुळे त्याचे हसूच थांबत नव्हते. 

 

10 तास चालले ऑपरेशन..
मुलाच्या आजाराबाबत समजल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की, मुलाच्या मेंदूमधील हा ट्युमर लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. हा ट्युमर त्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो असेही डॉक्टरांनी सांगितले. ट्युमर प्राथमिक अवस्थेत होता. तो काढण्यासाठी जवळपास 10 तास ऑपरेशन सुरू होते. ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्याचा ट्युमर काढण्यात आला. आता मुलगा पूर्णपणे बरा असून त्याला आता हसण्याचे झटके येत नाहीत. 

 

हसण्यामागे होत्या वेदना..

2 वर्षीय जॅकचे आई वडील या संपूर्ण प्रकाराबाबत बोलताना म्हणाले की, आमचा मुलगा कायम हसत राहायचा. आम्हालाही त्याचा फार आनंद व्हायचा. पण प्रत्यक्षात त्याला किती त्रास होत होता हे समजल्यानंतर आम्हाला सर्वांना प्रचंड धक्का बसला. 

 

काय आहे हा आजार..?
या आजाराला एपिलेप्टीक सिझर्स म्हटले जाते. हा आजार अत्यंत दुर्मिळ असतो आणि एक हजार लोकांमधून एकाला हा आजार होतो असे डॉक्टरांनी सांगितले. या आजारामुळे मेंदूपासून ते संपूर्ण शरिरातच अचानक ऊर्जा वाढते आणि ती ऊर्जा हसू किंवा आसू म्हणजेच अश्रुंच्या रुपात बाहेर पडते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...