आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Army Spokesperson Forcibly Advised Shahrukh Khan, Said 'You Should Speak Out Against The Atrocities Happening In Kashmir'

शाहरुखला पाक सेनेच्या प्रवक्त्याने बळजबरी दिला सल्ला, म्हणाला - 'तू काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराविरोधात बोलले पाहिजे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : पाकिस्तान सेनेचा प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर याने शाहरुख खानवर निशाणा साधत त्याला आपल्याबाजूने बोलण्याचा सल्ला दिला. झाले असे की, शाहरुखने हेरगिरीवर आधारित वेब सीरीज 'बार्ड ऑफ ब्लड' चा ट्रेलर शेअर केला होता. ज्याला कोट करत गफूरने त्याला सल्ला दिला की, त्याने भारत अधिकृत काश्मीरमध्ये अत्याचाराविरोधात बोलावे.  
 

हे आहे गफूरचे ट्वीट... 
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचा डायरेक्टर जनरल आसिफने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, "शाहरुख तू बॉलिवूड सिंड्रोममध्ये आहेस, सत्य जाणून घेण्यासाठी रॉचा हेर कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेब्रुवारी 2019 ला बघ. तू तर भारताद्वारा अधिकृत काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध बोलले पाहिजे, जे आरएसएसच्या नाजीवादी हिंदुत्वामुळे वाढते आहे."

बातम्या आणखी आहेत...