पाकिस्तानात बॉम्बस्फोटात 8 ठार, विरोधकांना केले तालिबानने टार्गेट

agencies | Update - May 28, 2011, 05:46 PM IST

पाकिस्तान आज पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले. उत्तरेकडील बजौर या आदिवासी भागात तालिबानी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यात 8 जण ठार झाले. तालिबानविरोधी गटातील दोन आदिवासी नेत्यांचाही त्यात समावेश आहे.

  • pak-blast

    पाकिस्तान आज पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले. उत्तरेकडील बजौर या आदिवासी भागात तालिबानी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यात 8 जण ठार झाले. तालिबानविरोधी गटातील दोन आदिवासी नेत्यांचाही त्यात समावेश आहे. मलिक मिया जान आणि मलिक तहसिन खान अशी या दोघांची नावे आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. बजौर भागातल्या पशट बाजारात स्फोट घडवण्यात आला. हा भाग तालिबानविरोधी मानला जातो. या दोन्ही नेत्यांनी तालिबानच्या विरोधात कारवाया केल्या होत्या. त्यामुळे हा भाग टार्गेट केल्याचे बोलले जाते. मलिक मिया हे एक हॉटेल चालवितात. तिथेच लक्ष्य करण्यात आले होते. दोघांना तालिबानकडून धमक्याही मिळत होत्या.

Trending