आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Builds 30 Launch Pads Near LoC, Plot To Infiltrate Terrorists Into Three Sectors

पाकने एलओसीजवळ 30 लाँच पॅड बनवले, तीन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीर मुद्द्यावर कूटनीतिक आघाडीवरील कट फसल्यामुळे संतप्त झालेला पाकिस्तान पुन्हा दहशतवादाचा वापर करण्यास सज्ज झाला आहे. सुरक्षा संस्थांच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचे ३० लाँच पॅड बनवले आहेत. तेथून केरन, गुरेज आणि गुलमर्ग या सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा कट रचला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना या भागात पोहोचवणे सुरू केले आहे. अफगाणी दहशतवाद्यांनाही नियंत्रण रेषेच्या जवळ पोहोचवले जात आहे. सूत्रांच्या मते, २३० ते २८० दहशतवादी येथे पोहोचवण्यात आले आहेत.विशेष म्हणजे पाकिस्तान सामान्य काश्मिरी लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार करू इच्छितो.  कोड वर्डचा वापर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर कोड वर्डचा वापर करत आहे. पीओकेत नियंत्रण रेषेच्या जवळ एफएम ट्रान्समिशनद्वारे हे कोड वर्ड पाठवले जात आहेत. जैश-ए-मोहम्मदसाठी ६६/८८, लष्कर-ए-तैयबासाठी ए ३ आणि अल बद्रसाठी डी ९ कोड आहे. हा संवाद पाकच्या कौमी तराना या राष्ट्रगीताच्या माध्यमातून होत आहे. गोपनीय माहितीनुसार व्हीएचएफ रेडिओ स्टेशन ‘कौमी तराना’ वाजवून एलओसीजवळून सिग्नल पाठवत होते.