आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातही हज सबसिडी बंद, 450 कोटी रुपये वाचणार; इम्रान खान सरकारचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने दरवर्षी हजसाठी नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद करत असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. पाकचे आंतरधर्मीय सलोखा मंत्री नूरुल हक कादरी यांनी सांगितल्याप्रमाणे, या निर्णयातून पाकिस्तान सरकार आणि करदात्याचे 450 कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत. विशेष म्हणजे, भारतात 2018 मध्ये हज यात्रींना दिली जाणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला.


मुळात इस्लाममध्ये हज यात्रींना सबसिडी देणे योग्य की अयोग्य असा वाद निर्माण झाला होता. त्यावर इम्रान खान यांच्या सरकारने अंतिम निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या पाकिस्तान सरकारने हजयात्रींना सबसिडी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामध्ये प्रत्येक हाजीमागे 42000 रुपयांची सवलत दिली जात होती. त्यावर एकूणच 450 कोटी रुपये सरासरी खर्च येत होता. पाकिस्तानातून या वर्षी 1 लाख 84 हजार लोकांना हजसाठी पाठवले जाणार आहे. त्यापैकी 1 लाख 7 हजार सरकारी कोट्यातून जातील. हज सबसिडी रद्द करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे, दिवसेंदिवस घसरते पाकिस्तानी चलन आणि सौदी अरेबिया सरकारकडून वाढते व्हॅट. आधीच आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तान सरकारचे या दोन गोष्टींनी आणखी हाल केले होते. त्यामुळे, 450 कोटी रुपयांची बचत पाकिस्तान सरकारच्या दृष्टीने खूप मोठी बचत आहे.

बातम्या आणखी आहेत...