Home | International | Pakistan | pak-nuclear

पाकिस्तानचा अणूकार्यक्रम पुर्ण गतीने सुरु, खान यांचा दावा

agencies | Update - May 30, 2011, 11:44 AM IST

पाकिस्तानचा अणूकार्यक्रम तीव्र गतीने सुरु असल्याची माहिती पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या चवथी अणूभट्टी 2013पर्यंत कार्यरत होईल.

 • pak-nuclear

  पाकिस्तानचा अणूकार्यक्रम तीव्र गतीने सुरु असल्याची माहिती पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या चवथी अणूभट्टी 2013पर्यंत कार्यरत होईल. तर पाकिस्तानची अण्वस्त्रे पुर्णपणे सुरक्षित असून दहशतवादी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावा खान यांनी केलाआहे. खान यांच्यावर दुसऱ्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान विकण्याचा आरोप होता. सरकारने त्यांना नजरकैदेतही ठेवले होते.
  गेल्या 10 वर्षांपासून ते अणू कार्यक्रमापासून दुर असले तरीही त्यांना त्याबद्दल पुर्ण माहिती असल्याचे खान यांनी सांगीतले. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, अणू कार्यक्रम पुर्ण गतीने सरु आहे. पाकिस्तानात पुरेशा प्रमाणात युरेनियम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत काळजीचे कारण नाही. अण्वस्त्रे अतिसुरक्षित आहेत. सर्व अण्वस्त्रे एकाच ठिकाणी नसून वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याबद्दल अतिशय कमी लोकांना माहिती असल्याचा दावा खान यानी केला आहे.
  एकीकडे खान यांनी अण्वस्त्रे सुरक्षित असल्याचा दावा करतात तर दुसरीकडे म्हणतात की अण्वस्त्रे तयार नसून सर्व भाग तयार आहे आणि गरज पडल्यास कोणत्याही क्षणी बॉम्ब तयार करता येऊ शकतो. अशा दुतोंडी वक्तव्यामुळेच पाकिस्तानवरील जगाचा विश्वास कमी झाला आहे. म्हणूनच फ्रान्सने पाकिस्तानला अणुउर्जा तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता.

  आपले मत
  पाकिस्तानची अण्वस्त्रे खरोखरच सुरक्षित आहेत काय? आपले मत खाली दिलेल्या कॉमेन्ट बॉक्समध्ये लिहून व्यक्त करा. कोणत्याही आपत्तीजनक मतासाठी वाचक स्वत: जबाबदार असतील.

Trending