आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने प्रकल्पाची दारे उघडली, पंजाबच्या १७ गावांना पुराचा वेढा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधरमधील जानिया गाव पाण्यात बुडाले आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू घेऊन जाताना लाेक. - Divya Marathi
जालंधरमधील जानिया गाव पाण्यात बुडाले आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू घेऊन जाताना लाेक.

चंदिगड - पाकिस्तानच्या बाजूने सतलज नदीवरील प्रकल्पांची दारे उघडल्यामुळे भारतातील पंजाबच्या फिराेजपूरमधील गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. १७ गावांना पुराने वेढा घातला आहे. अगाेदरच या परिसराला अलीकडेच मुसळधार पावसाने झाेडपून काढले. त्यामुळे लाेकांच्या अडचणी वाढल्या आहेत, अशी माहिती फिराेजपूरचे उपायुक्त चंदर गैंद यांनी दिली. 

पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील प्रदूषित नदीचे पाणी साेडण्यात आले. त्यामुळे आराेग्यविषयक माेठी समस्या निर्माण झाली आहे. कारण ते कर्कराेगाचे कारण आहे. कसूर जिल्हा हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चर्म उद्याेगाचे केंद्र मानले जाते. या उद्याेगामुळे सतलजचे पाणी या क्षेत्रात प्रदूषित झाले आहे. दुसरीकडे या भागात प्रशासनाने मदतकार्याला सुरुवात केली आहे. 

लष्कर तसेच एनडीआरएफच्या जवानांनी पूरग्रस्त भागात अडकलेल्या लाेकांना सुरक्षित ठिकाणी पाेहाेचवण्याची माेहीम सुरू केली आहे. 

काही दिवसांपूर्वी सतलजमध्ये भारताने काेणतीही पूर्वसूचना न देता २ लाख क्युसेक पाणी साेडले त्यातून देशात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आराेप पाकिस्तानने केला हाेता.
 

केरळ, तामिळनाडूत पावसाची हजेरी 
केरळमध्ये मान्सून सक्रिय असून गुरुवारी पावसाने केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकची सीमा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडूमधील काही भागाला झाेडपून काढले. मनाली -केलाँग महामार्गावर बुधवारी पुन्हा दरडी काेसळल्या. त्यामुळे मनालीहून लाहाैल, लेह, पांगीकडे जाणारी शेकडाे वाहने या मार्गावर ठप्प झाली आहेत. त्यांना रात्र याच मार्गावर काढावी लागली. जम्मू-काश्मिरातील काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. हिमाचल तसेच उत्तरेतील काही भागांनाही पावसाने झोडपून काढले. 
 

उत्तर प्रदेशात पावसाच्या विविध दुर्घटनांत ५ ठार 
उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नद्यांना पूर आला अाहे. पुरासंबंधीच्या विविध घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रतापगड व भदाेई जिल्ह्यातील बलियात तीन लाेक वाहून गेले. गंगेची जलपातळी धाेक्याच्या स्तरापर्यंत पाेहाेचली आहे. मथुरेत यमुनाही काेपली आहे.  प्रतापगडमध्ये वीज काेसळून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृृत्यू झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...