International Special / पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सहकाऱ्याने इम्रान खान यांच्या नावाने पोस्ट केला सचिन तेंडुलकरचा फोटो, सोशल मीडियावर होत आहे ट्रोल


यापूर्वी इम्रान यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या ओळींना खलील जिब्रान यांच्या सांगितल्या होता
 

दिव्य मराठी

Jun 23,2019 02:54:00 PM IST

लाहोर(पाकिस्तान)- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विशेष सहकारी नईम उल हकने सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केल्यामुळे नेटकऱ्यांच्या निशान्यावर आले. झाले असे की, नईम उल हकने ट्विटरवर तेंडुलकरच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आणि त्यासोबत कॅप्शन लिहीले, ''इमरान खान, 1969.''


नईमने जसा फोटो ट्वीट केला, ते ट्विटर यूझर्सच्या निशान्यावर आले. एका यूझरने विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहीले, "इंजमाम उल हक, 1976."


दुसऱ्या एका युझरने एका लहान बाळाचा जांभई देतानाचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहीले, "सरफराज 1987."

X