आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Showed A White Flag To Carry The Bodies Of Its Soldiers But The Next Day Pak Opened Fire On The School

आपल्या सैनिकांचे मृतदेह नेण्यासाठी पाकने दाखवला पांढरा झेंडा; भारताने गोळीबार थांबवला, मात्र दुसऱ्याच दिवशी पाकने शाळांवर डागले तोफगोळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू । नियंत्रण रेषेवर गोळीबार करणाऱ्या पाक सैनिकांचा दुटप्पीपणा शुक्रवारी दिसला. व्याप्त काश्मीरच्या हाजीपूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेह उचलून नेण्यासाठी पाकने शुक्रवारी चक्क पांढरा झेंडा दाखवला. मात्र, दुसऱ्याच दिवशी पूंछच्या मेंढर भागात शाळा व घरांवर उखळी तोफांचा मारा केला. शाळेतून परतणारी २० मुले यात अडकली. मात्र, भारतीय जवानांनी या मुलांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर पाच किलोमीटर परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या.  - १० व ११ सप्टेंबरला भारताच्या कारवाईत पाकचे पंजाबमधील जवान गुलाम रसूल व अन्य एक मारला गेला.  - भारतीय हद्दीत गोळीबार करत हे मृतदेह उचलण्याचा प्रयत्न पाकने केला. अपयश आल्यावर १३ सप्टेंबरला सरळ पांढरा झेंडा दाखवला. - भारतीय लष्करानेही याचा सन्मान करत गोळीबार थांबवला.  - पाकने शनिवारी भारतीय उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना पाचारण केले.  - नियंत्रण रेषेवर आपला नासिर हुसेन हा जवान मारला गेल्याची पाकची कबुली.