आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, चेन्नईसह देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्यांची धमकी, रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाले जैशचे पत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतातील प्रमुख रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील रेल्वे अधिकाऱ्यांना शनिवारी जैशकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. यामध्ये मंदिर आणि रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि रोहतकसह अनेक महत्वाच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

8 ऑक्टोबर रोजी हल्ला करणार असल्याची धमकी
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे पत्र भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे. यावर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या स्वाक्षरी असल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये 8 ऑक्टोबर रोजी स्टेशन आणि मंदिरांवर हल्ला करणार असल्याची धमकी आहे. यापूर्वी गुरुवारी पोलिसांनी जम्मू-काश्मीरातील कठुआ येथे जैशच्या 3 दहशतवाद्यांना दारुगोळ्यासह अटक करण्यात आली होती. यातील दोघे अमृतसर मार्गे काश्मीरला जात होते. भारतात हल्ले करून दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल असेही पत्रातून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...