आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक दहशतवादी केव्हाही करू शकतात भारतावर हल्ला : अमेरिकेचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेने भारताला दहशतवादी हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले की, भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने काही देशांना भीती वाटते आहे. भारताने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवर योग्य लगाम लावला नाही तर भारताच्या निर्णयामुळे तिळपापड झालेल्या अतिरेकी संघटना जम्मू-काश्मिरात हल्ले करण्याची शक्यता आहे. भारत-प्रशांत संरक्षण विषयाचे सहायक संरक्षणमंत्री रँडल शायव्हर म्हणाले की, दहशतवादाबाबत चीन पाकची पाठराखण करेल असे मला वाटत नाही. 
 

एनआयएचे दोषारोपपत्र : फुटीरवाद्यांना फंडिंगमध्ये पाक वकिलातीचा हात
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काश्मीरमधील अतिरेक्यांना आणि फुटीरवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतच्या तपासात पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचा पर्दाफाश केला आहे. याच्याशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या मते, हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी, शब्बीर शाह, यासीन मलिक, असिया अंद्राबी आणि मसरक आलम यांना नवी दिल्लीतील पाकिस्तानी वकिलात, पाकशी संंबंधित अतिरेकी संघटना, नियंत्रण रेषेवर व्यापार आणि हवाला चॅनलच्या माध्यमातून पैसे मिळाले आहेत. एनआयए गुरुवारी यासंबंधी दाखल करण्यात येणाऱ्या दोषारोपपत्रात या सर्व बाबींचा समावेश आहे. 
 

3 गुप्तचर अहवाल : ३००० पाकिस्तानी नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या तयारीत
 
गेल्या आठवड्यात गुप्तचरांच्या तीन वेगवेगळ्या अहवालांत पाकच्या षड‌्यंत्राबाबत इशारा
 
> गृह मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की, ३००० पाकिस्तानी नागरिक नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या तयारीत. हिवाळा सुरू होताच घुसण्यास सज्ज.

> आयबीने म्हटले आहे की, नियंत्रण रेषेवर ३२ पाक चौक्यांवर अतिरेकी सज्ज. पाक लष्कराच्या संरक्षणात ते सीमा ओलांडण्याच्या तयारीत.

> पंजाबमध्ये ड्रोनने शस्त्रे पाठवल्याबाबत गुप्तचर संस्थांनी सांगितले, ही शस्त्रे गँगस्टर्सना पाठवली गेली. खलिस्तानी चळवळीतील लोकांनाही पाकचा निधी.
 

ड्रोन नष्ट, खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

अमृतसर  - पंजाब पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा दहशतवादी साजन प्रीतसिंह बिट्टाला अटक केली. साजन पाकमध्ये स्थायिक रणजितसिंह बिट्टा या दहशतवाद्याच्या संपर्कात होता. त्यानेच पाकमधून आलेले ड्रोन जाळून नष्ट केले होते. 
 ड्रोनद्वारे शस्त्रांच्या तस्करी प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला.
 
 

बातम्या आणखी आहेत...